Pimpri Chinchwad: ‘आम्ही या एरियाचे भाई आहोत’, असे म्हणत तरुणावर कोयत्याने वार
By नारायण बडगुजर | Updated: October 16, 2023 18:21 IST2023-10-16T18:20:42+5:302023-10-16T18:21:39+5:30
रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली....

Pimpri Chinchwad: ‘आम्ही या एरियाचे भाई आहोत’, असे म्हणत तरुणावर कोयत्याने वार
पिंपरी : ‘आम्ही या एरियाचे भाई आहोत’, असे म्हणत तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले. गांधीनगर, पिंपरी येथे रविवारी (दि. १५) रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
तुषार राजू बनपट्टे (२२, रा. खराळवाडी, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वैभव हातगळे (२५) आणि त्याच्या इतर साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार आणि त्यांचा मित्र करण विठ्ठल बनपट्टे हे गांधीनगर येथील एका टपरीसमोर आईसक्रीम खात थांबले होते. त्यावेळी तिथे हातातील कोयते फिरवत आरोपी आले. ‘आम्ही या एरियाचे भाई आहोत’ असे म्हणून त्यांनी विनाकारण फिर्यादी तुषार यांच्या डोक्यात कोयत्याने मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी दहशत निर्माण करत निघून गेले, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक शीतल गिरी तपास करीत आहेत.