महापालिकेचे संकेतस्थळ आॅफलाइन

By admin | Published: May 3, 2017 02:32 AM2017-05-03T02:32:58+5:302017-05-03T02:33:36+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ गेल्या अनेक दिवसांपासून अपडेट झालेले नाही. त्यामुळे करदात्या नागरिकांना महापालिकेमार्फे त

Website of the municipal website | महापालिकेचे संकेतस्थळ आॅफलाइन

महापालिकेचे संकेतस्थळ आॅफलाइन

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ गेल्या अनेक दिवसांपासून अपडेट झालेले नाही. त्यामुळे करदात्या नागरिकांना महापालिकेमार्फे त होत असलेल्या कामांची माहिती मिळत नाही. स्मार्ट सिटीतील महापालिकेचे संकेतस्थळ आॅफलाइन असून पालिकेचे संकेतस्थळ लवकरात-लवकर अपडेट करण्याची मागणी होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संकेतस्थळावर क्षेत्रीय कार्यालयनिहाय विविध विकासकामांचे दिलेले आदेश, करारनामे मागील वर्षीचे आहेत. परंतु, चालू वर्षाचे नाहीत. त्यामुळे शहरातील करदात्या नागरिकांना विकासकामांची माहिती मिळत नाही. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळाचा उद्देशही सफल होत नाही. संकेतस्थळावरील कामाचे आदेश या शीर्षकावर क्लिक केले असता मागील वर्षीची माहिती दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना चालू वर्षाच्या कामाची माहिती मिळत नाही. प्रशासनाने अ,ब,क,ड, इ आणि फ या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत विविध कामांचे मागील वर्षाचे दिलेले आदेश संकेतस्थळावर दिसत आहेत. परंतु, चालू वर्षाचे अपडेट नाही. तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात महापालिकेचे संकेतस्थळ दररोज अपडेट होत होते. कामाचे आदेश, काम करणाऱ्या ठेकेदाराची संपूर्ण माहिती दिली जात होती. त्यामुळे सामान्य जनतेला घरबसल्या महापालिकेत होत असलेल्या विविध घडामोडी व कामांची माहिती समजत होती; परंतु गेल्या काही दिवसांपासून पालिकेचे संकेतस्थळ अपडेट होत नसल्याने करदात्या नागरिकांना माहिती मिळणे कठीण झाले आहे.
प्रशासकीय प्रभागात होत असलेली विविध विकासकामे, त्यावर होत असलेला खर्च, कामाची मुदत, काम करणारा ठेकेदार, कामाचा आदेश, त्याच्याशी केलेला करारनामा आदी सविस्तर माहिती नागरिकांना समजत नाही. शिक्षण झोपटपट्टी निर्मूलन विभाग, स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, माहिती-तंत्रज्ञान आदी कामकाजाचे अपडेट नाही.(प्रतिनिधी)

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. रहिवासी असलेल्या पण शहरात घर नसणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. संकेत स्थळावर आॅफलाइन साईट ओपन होत आहे. संकेतस्थळ लवकर अपडेट करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी केली आहे.

Web Title: Website of the municipal website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.