संकेतस्थळीच आचारसंहिता भंग

By admin | Published: February 14, 2017 02:06 AM2017-02-14T02:06:00+5:302017-02-14T02:06:00+5:30

पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन महिना उलटला असताना, पुणे जिल्हा परिषद व पीएमपीच्या

The website violates the Code of Conduct | संकेतस्थळीच आचारसंहिता भंग

संकेतस्थळीच आचारसंहिता भंग

Next

देहूरोड : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन महिना उलटला असताना, पुणे जिल्हा परिषद व पीएमपीच्या संकेतस्थळावर लोकप्रतिनिधींची छायचित्रे संबंधित संकेतस्थळावर अद्यापही झळकत आहेत. त्यामुळे संबंधित संस्थांकडून आचारसंहितेचा भंग होत नाही का, जिल्हा निवडणूक अधिकारी दखल घेतील का, असा सवाल जागरूक नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता सर्वत्र ११ जानेवारीपासून लागू झाली आहे. सर्वांवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याची कायदेशीर जबाबदारी आहे, असे असताना जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ६६६.स्र४ल्ली९स्र.ङ्म१ॅ मान्यवर शीर्षकावर क्लिक केले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री वीरेंद्रसिंह चौधरी, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे , तसेच मंगलदास बांदल , अतिश परदेशी , सारिका इंगळे , वंदना धुमाळ या विविध सभापतींची छायाचित्रे झळकत आहेत. पदाधिकारी व सदस्य या शीर्षकाखाली सर्व ७५ जिल्हा परिषद सदस्यांची आणि जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या सर्व पंचायत समिती सभापतींची छायाचित्रे दिसत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The website violates the Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.