उंटावरून साखर वाटून ‘ती’चे स्वागत

By admin | Published: April 9, 2017 04:32 AM2017-04-09T04:32:26+5:302017-04-09T04:32:26+5:30

स्त्रीभृणहत्येच्या घटना घडत असताना, मुलगी व्हावी, अशी अपेक्षा बाळगलेल्या रेड्डे दाम्पत्याला कन्यारत्न झाले. लक्ष्मीच्या रूपाने घरात मुलीचे आगमन झाले. त्यामुळे

Welcome to 'She' by distributing sugar from camel | उंटावरून साखर वाटून ‘ती’चे स्वागत

उंटावरून साखर वाटून ‘ती’चे स्वागत

Next

पिंपरी : स्त्रीभृणहत्येच्या घटना घडत असताना, मुलगी व्हावी, अशी अपेक्षा बाळगलेल्या रेड्डे दाम्पत्याला कन्यारत्न झाले. लक्ष्मीच्या रूपाने घरात मुलीचे आगमन झाले. त्यामुळे आनंदून गेलेल्या रेड्डे कुटुंबीयांनी पिंपळे गुरव येथील गांगर्डेनगरमध्ये उंटावरून साखरवाटप केली. एवढेच नव्हे, तर बेटी बचाव बाबत कैलास व वर्षा रेड्डे यांनी जनजागृती केली.
रेड्डी कुटुंबीय मूळचे परभणीचे़ मात्र, गेल्या ४० वर्षांपासून ते गांगर्डेनगर परिसरातच वास्तव्यास आहेत. २०११ मध्ये कैलास व वर्षा यांचा विवाह झाला. कैलास यांची पत्नी वर्षा यांनी डी़एड़ पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्या खासगी शाळेत नोकरीस आहेत. तर कैलास बांधकाम साईटवर काम करतात. कैलास यांना चार बहिणी होत्या. त्यातील एकीचे काही वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले.
कैलास त्यांच्या आई वडिलांसाठी एकुलता एक मुलगा अशी परिस्थिती असताना, वंशवेल वाढविण्यासाठी मुलगाच हवा, असा आग्रह त्यांनी कधी धरला नाही. मुलगी व्हावी,अशीच अपेक्षा त्यांनी बाळगली होती. एवढेच नव्हे, तर समाजात वावरताना, नेहमी ते बेटी बचावचे महत्त्व पटवून देत होते.
स्वत:चा वाढदिवस साजरा करतेवेळी तसेच संक्रांतीला तीळगूळवाटप करतानाही ते मुलीचे महत्त्व पटवून देणारे शुभेच्छा पत्रवाटप करायचे. मुलगी व्हावी, ही इच्छा पूर्ण झाली. याचा आनंद झाल्याने परिसरातील नागरिकांना त्यांनी साखर वाटली. (प्रतिनिधी)

Web Title: Welcome to 'She' by distributing sugar from camel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.