Pimpri Chinchwad: पार्ट टाईम पैसे कमवायला गेला ३० लाखांना गंडला, गुन्हा दाखल

By प्रकाश गायकर | Published: February 2, 2024 08:14 PM2024-02-02T20:14:48+5:302024-02-02T20:15:06+5:30

एका अनोळखी मोबाइलधारकावर तसेच विविध बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Went to earn money part-time, defrauded of Rs 30 lakh, case registered | Pimpri Chinchwad: पार्ट टाईम पैसे कमवायला गेला ३० लाखांना गंडला, गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad: पार्ट टाईम पैसे कमवायला गेला ३० लाखांना गंडला, गुन्हा दाखल

पिंपरी : पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून तरुणाची ३० लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना २४ ते ३० जानेवारी या कालावधीत कस्पटेवस्ती, वाकड येथे ऑनलाइन पद्धतीने घडली. याप्रकरणी कुमारजीत देबाशीश शर्मा ( वय ३९) यांनी वाकडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, एका अनोळखी मोबाइलधारकावर तसेच विविध बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या व्हॉटसअपवर आरोपीने पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवले. यासाठी एका टेलिग्राम अकाऊंटवर विविध टास्क देऊन ते टास्क पूर्ण करण्यास सांगितले. त्यातून फिर्यादी यांनी कमावलेले पैसे वेळोवेळी विविध अकाउंटवर पाठवायला सांगून फिर्यादी यांची ३० लाख २० हजार ३७० रुपयांची फसवणूक केली.

Web Title: Went to earn money part-time, defrauded of Rs 30 lakh, case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.