अब्दुल सत्तारचे करायचे काय, खाली डोक वर पाय; सदस्यांची घोषणाबाजी, सत्तार निघून गेले, निगडीतील प्रकार

By अविनाश रावसाहेब ढगे | Published: October 3, 2024 05:36 PM2024-10-03T17:36:18+5:302024-10-03T17:37:18+5:30

मंडळाचा एक सदस्य बोलत असताना सत्तार यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदस्यांकडून घोषणाबाजीला सुरुवात झाली

What to do with Abdul Sattar, head down, feet up; Activists chanted, seventy gone | अब्दुल सत्तारचे करायचे काय, खाली डोक वर पाय; सदस्यांची घोषणाबाजी, सत्तार निघून गेले, निगडीतील प्रकार

अब्दुल सत्तारचे करायचे काय, खाली डोक वर पाय; सदस्यांची घोषणाबाजी, सत्तार निघून गेले, निगडीतील प्रकार

पिंपरी : राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांनी अब्दुल सत्तारचे करायचे काय. खाली डोक वर पाय, पन्नास खोके एकदम ओक्केच्या घोषणांनी गुरुवारी (दि. ३) निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे कार्यक्रमात गदारोळ झालेला दिसून आला. 

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल, शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोयी-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना इत्यादी विषयाचे अनुषंगाने संवाद साधण्यासाठी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. यावेळी अब्दुल सत्तार नियोजित कार्यक्रमाला दीड तास उशिरा पोहचले. तेथे आल्यानंतर केवळ एकाच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश दिले. प्रतिनिधी बोलत असताना सत्तार यांनी त्या प्रतिनिधीला थांबवले. तुम्ही तुमचे प्रश्न मांडा. वाद निर्माण होईल असे वक्तव्य करु नका. मला राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीला जायचे आहे असे म्हणत परिषदेतून काढता पाय घेतला आणि ते निघून गेले. त्यांनतर सभागृहात गोंधळ सुरूच होता. सदस्यांकडून सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात होती. 

Web Title: What to do with Abdul Sattar, head down, feet up; Activists chanted, seventy gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.