खोर परिसरात गहूकाढणीला वेग
By admin | Published: February 20, 2017 02:19 AM2017-02-20T02:19:52+5:302017-02-20T02:19:52+5:30
खोर (ता. दौंड) परिसरात सध्या गहूकाढणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने
खोर : खोर (ता. दौंड) परिसरात सध्या गहूकाढणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी केली होती. जास्त प्रमाणात उत्पादन काढण्याच्या दृष्टिकोनातून सलग पट्ट्यात पेरणी करण्यात आली. त्यानुसार सध्या गहू काढणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
च्कमीत कमी वेळात हार्वेस्टरच्या सहाय्याने काढणी करण्यात येत आहे.
च्ज्वारीच्या रब्बी हंगामाबरोबरच शेतकऱ्यांनी कांदा, कडधान्ये यांची पिके घेतली होती. या वर्षीदेखील चांगल्या प्रकारे गव्हाच्या पिकाला प्राधान्य देण्यात आले होते. च्जास्तीत जास्त उत्पादन या वर्षी गहू पिकाचे होईल, अशी माफक अपेक्षा शेतकरीवर्गाची आहे. खोर, देऊळगावगाडा, पडवी, माळवाडी, नारायण बेट परिसर मोठ्या प्रमाणात गहू पिकाच्या काढणीला सध्या वेग आला आहे.(वार्ताहर)