महामार्ग चौपदरीकरणाला मुहूर्त कधी?

By admin | Published: May 11, 2015 06:09 AM2015-05-11T06:09:59+5:302015-05-11T06:09:59+5:30

मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे देहूरोड ते निगडी जकात नाका दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

When the highway is muhurat four degrees? | महामार्ग चौपदरीकरणाला मुहूर्त कधी?

महामार्ग चौपदरीकरणाला मुहूर्त कधी?

Next

देवराम भेगडे

मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे देहूरोड ते निगडी जकात नाका दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून, आणखी किती बळी गेल्यावर महामार्गाचे रुंदीकरणाला मुहूर्त लागणार? रुंदीकरणासाठी रस्ते विकास महामंडळाकडून निविदा प्रक्रिया तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाचे आदेश देण्यात येणार असल्याने साधारणपणे एप्रिलअखेर काम सुरू होणार असल्याचे संबंधित अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले होते. देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या सदस्य शपथविधी व उपाध्यक्ष निवडीच्या वेळी फेब्रुवारीत आमदार बाळा भेगडे यांनी १ एप्रिलला चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे जाहीर केले होते.
रस्ते विकास महामंडळाने महामार्ग क्रमांक चारचा निगडी ते शिळफाटा (ठाणे) हा किलोमीटर क्रमांक २०/४०० ते १३१/२०० दरम्यानचा रस्ता म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे ९ आॅगस्ट २००४ ला झालेल्या करारानुसार ‘ बीओटी तत्त्वावर चौपदरीकरण करण्यासाठी देण्यात आला होता. सदर रस्त्याचे विविध ठिकाणी कामे अपूर्ण असताना सप्टेंबर २००६पासून या महामार्गावर टोलवसुली सुरू केली आहे. निगडी जकात नाका ते देहूरोड पोलीस ठाण्यापर्यंतच्या सव्वासहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू झालेले नाही. निगडी ते देहूरोड या दोनपदरी अरुंद रस्त्याचे केवळ डांबरीकरणाचे काम झाले आहे. देहूरोड ते निगडी महामार्ग खूपच अरुंद असल्याने, तसेच महामार्गाच्या संरक्षक साइडपट्ट्या व मुख्य डांबरी रस्ता यात अंतर असल्याने दुचाकीस्वारांचे अपघातांचे प्रमाण सर्वाधिक असून, शंभराहून अधिक व्यक्तींना प्राण गमवावे लागल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या अरुंद रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात होतच आहेत.
देहूरोड बाजारपेठ परिसरात महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून सर्व अतिक्रमणे हटविण्यात आली. मात्र, अद्यापही रस्त्यालगत राडारोडा पडलेला आहे. स्वामी विवेकांनद चौक व जुन्या बँक आॅफ इंडिया चौकातही सातत्याने अपघात आणि वाहतूककोंडी होत आहे. दोन्ही ठिकाणी भुयारी मार्ग उभारणी, देहूरोड लोहमार्ग ते डॉ. आंबेडकर रुग्णालय दरम्यान उड्डाणपूल उभारण्याची मागणी वेळोवेळी झाली आहे. अधिकारी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सकरात्मक दृष्टिकोन ठेवून सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून निधीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पर्याय म्हणून द्रुतगती महामार्ग उभारणी झाल्यानंतर या महामार्गावरील बहुतांशी वाहतूक कमी होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, दिवसागणीक वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येने तो फोल ठरवला आहे. त्यामुळे रुंदीकरण गरजेचे आहे.
---------

राज्यात व केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना मागील दहा वर्षांत निगडी-देहूरोडदरम्यानच्या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी तत्त्वत: मंजुरी मिळाली असल्याबाबत अनेकदा सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषदा घेऊन जाहीर केले होते. मात्र, आवश्यक निधी न मिळाल्याने रुंदीकरण होऊ शकले नव्हते. गेल्या वर्षी केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारकडून हवा असणारा निधी उपलब्ध होणार असल्याचे संबंधित पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा जाहीर होऊनही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही.

Web Title: When the highway is muhurat four degrees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.