बेबडोहोळ पूल पूर्ण होणार तरी केव्हा?

By Admin | Published: June 30, 2017 03:41 AM2017-06-30T03:41:57+5:302017-06-30T03:41:57+5:30

गेली सहा वर्षापासून सुरू असलेल्या बेबडोहोळ येथील पुलाचे अद्याप काम पूर्ण न झाल्याने याचा ताण जुन्या पुलावर येत असल्याने

When the irreverent bridge is full? | बेबडोहोळ पूल पूर्ण होणार तरी केव्हा?

बेबडोहोळ पूल पूर्ण होणार तरी केव्हा?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
उर्से : गेली सहा वर्षापासून सुरू असलेल्या बेबडोहोळ येथील पुलाचे अद्याप काम पूर्ण न झाल्याने याचा ताण जुन्या पुलावर येत असल्याने हा ४० वर्षांपूर्वीचा साकव पूल व थुगाव येथील साकव पूल केव्हाही ढासळू शकतो. या जुन्या साकव पुलांचा प्रश्न समोर आल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनी याची धास्ती घेतली आहे. या दोन्ही साकव पुलांच्या मोऱ्या जीर्ण झाल्या आहेत.
कासवाच्या गतीने सुरू असलेल्या बेबडोहोळ-परंदवडी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी दर वर्षी मागणी करण्यात येते. येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी तरी हा पूल वाहतुकीसाठी चालू करावा, अशी मागणी पंचक्रोशीतील गावकरी करतात. सन २००८-०९ मध्ये मुसळधार पावसामुळे बेबडोहोळ साकव पुलाची नऊ नंबरची मोरी वाहून गेली होती. चांदखेड येथील एक युवकही पुलावरून जाताना वाहून गेला. याची तत्परतेने दखल घेत या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले. काम चालू झाल्यानंतर पुलाची उंची वाढविण्याच्या मुद्यावरून एक वर्ष वाया गेले. यानंतर पुलाची उंची अधिक वाढविल्याने काही जागेच्या तांत्रिक मुद्यामुळे पुलाचे काम पुन्हा थांबले होते. मात्र, पुन्हा काम सुरू करण्यात आले. सध्या:स्थितीत पुलाचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. सध्या वाहतूक सुरू आहे त्या साकव पुलाची वाहतूक वजन क्षमता दोन ते तीन टन एवढीच आहे. पण, गेल्या १५ ते २० वर्षापासून १५ ते २० टनांपर्यंत वाहतूक पुलावरून केली जात आहे. यामुळे हा खचत चाललेला साकव पूल केव्हाही कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते. तरीही कालबाह्य झ् पुलावरून वाहतूक सुरू ठेवली आहे.
नवीन पुलाचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे. पवन मावळातील हा मुख्य एकमेव पूल आहे. थुगाव येथील ४० वर्षांपूर्वीचा साकव पूलही धोक्याची घंटा देत आहे. पण, या पुलाकडे अधिकाऱ्यांची डोळेझाक सुरू आहे. कठडे तुटले असून पुलावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काही मोऱ्या जीर्ण झाल्या आहेत. पुलाची डागडुजी गेल्या चाळीस वर्षात केलेली नाही. आढे, ओझर्डे, सडवली, बउर, थुगाव, शिवणे, कोथुर्णेतील नागरिकांसाठी हाच वाहतुकीचा मार्ग आहे.

Web Title: When the irreverent bridge is full?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.