सांगवी ठाण्याला हक्काची जागा कधी?

By admin | Published: January 24, 2017 02:08 AM2017-01-24T02:08:58+5:302017-01-24T02:08:58+5:30

सांगवी, पिंपळे गुरव आणि जवळपास वाकड-काळेवाडीपर्यंतच्या परिसराची सुरक्षा,सुव्यवस्था ज्या पोलीस स्टेशनवर आहे त्या सांगवी

When is the place of claim for Thane? | सांगवी ठाण्याला हक्काची जागा कधी?

सांगवी ठाण्याला हक्काची जागा कधी?

Next

नवी सांगवी : सांगवी, पिंपळे गुरव आणि जवळपास वाकड-काळेवाडीपर्यंतच्या परिसराची सुरक्षा,सुव्यवस्था ज्या पोलीस स्टेशनवर आहे त्या सांगवी पोलीस स्टेशनला हक्काची जागा आजपर्यंत मिळाली नाही.
पुणे पोलीस आयुक्तांकडून सांगवी पोलीस स्टेशनची निर्मिती झाली. अगदी सुरुवातीला छोट्याशा पोलीस चौकीचे स्वरूप हळूहळू वाढू लागले. स्वतंत्र पोलीस स्टेशनची निर्मिती झाली. पण सुरुवातीपासून भाड्याच्या जागी असलेले पोलीस स्टेशन आजही भाड्याच्या जागेतच आहे. परिसराचा विकास झाला, तशी गुन्हेगारी वाढली. ठाणे अंमलदार ते मुख्य पोलीस निरीक्षक यांचे बसण्यासाठी केलेले दालन अतिशय छोट्या जागेत असून, पुरेशी जागा नसल्याने पोलीस स्टेशनला येणारे तक्रारदार, नागरिक आणि खुद्द पोलीस कर्मचारी यांस बसण्यासाठी जागा नाही हे दिसून येते. रहिवासी इमारत असल्याने सततच्या तक्रारी, आरोपींचे येणे-जाणे, त्यांना मारणे, बोलणे यामुळे येथील रहिवासी, पोलीस यांच्यात वाद होतात. कर्मचाऱ्यांची वाहने, पोलीस गाड्याना र्पाकिंग नसल्याने रस्त्यावर लावली जाऊन रहदारीस अडथळा होतो. (वार्ताहर)

Web Title: When is the place of claim for Thane?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.