सदोष मतदारयादी दुरुस्त कधी होणार?

By admin | Published: January 13, 2017 02:42 AM2017-01-13T02:42:41+5:302017-01-13T02:42:41+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसमवेत निवडणूक आयोगाने

When will the faulty voter turn up? | सदोष मतदारयादी दुरुस्त कधी होणार?

सदोष मतदारयादी दुरुस्त कधी होणार?

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसमवेत निवडणूक आयोगाने बैठक घेतली. या वेळी आदर्श आचारसंहितेची माहिती देण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी मतदारयादी सदोष आहे, अशा तक्रारी केल्या. उमेदवारी अर्ज कसा भरावा, येथपासून तर जमाखर्च कसा ठेवावा याविषयी माहिती घेतली. प्रभागांमध्ये फ्लेक्सवर कारवाई कधी होणार असे प्रश्न विचारले.
महापालिका भवनात निवडणूक विभागाच्या वतीने अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्यात बैठक घेतली.
या वेळी आयुक्त दिनेश वाघमारे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, वैशाली जाधव माने, वि. स. पळसुले, भीमराव शिंगाडे, अजय चांदखेडे, अरूण वायकर, श्रीधर जाधव, सहायक आयुक्त प्रद्श्री तळदेकर, वाय.एन कडूसकर, प्रवीण आष्टीकर, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. या बैठकीत मतदार याद्यासंदर्भात तक्रारी केल्या.
निवडणूक विभागाचा वॉच
बोपखेल परिसरातील राजकीय फलक, अण्णासाहेब मगर स्टेडीयम परिसरात कार्यक्रम सुरू आहे, अशा तक्रारी आल्या त्याविषयी आयुक्तांनी प्रशासनास आदेश दिले. चारपैकी एकाच उमेदवारास मतदान करू शकतो का, नामनिर्देशन पत्र दाखल करताना कोणती अ‍ॅफेडेविट जोडावेत, अशी मते राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. या वेळी आयुक्त वाघमारे यांनी शंकांचे निरसन केले. आयुक्त दिनेश वाघमारे आणि निवडणूक विभागाचे डॉ. माने यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. चारपैकी एका उमेदवारास मतदान करू शकतो, मात्र, मतदानानंतर एन बटन दाबायचे आहे.  सोशल मीडियावरही निवडणूक विभागाचा वॉच असणार आहे, तसेच सायबर क्राईमच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्याची कार्यवाहीही होईल. असे असे आयुक्तांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
लोकप्रतिनिधींची पाठ : शहराध्यक्षांची दांडी
निवडणूक विभागाने बोलावलेल्या बैठकीस प्रमुख राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष गैरहजर होते. बैठकीला दांडी मारल्याचे दिसून आले. खासदार आमदारही या बैठकीला फिरकले नाहीत. काँग्रेसचे संग्राम तावडे, भाजपाचे रामकृष्ण राणे, माऊली थोरात, राष्ट्रवादी काँग्रेचे रामदास मोरे, शिवसेनेचे भगवान वाल्हेकर आदी शहराध्यक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एमआयएमचे अखिल मुजावर हेही उपस्थित होते. त्याशिवाय हिंद काँग्रेस पार्टीचे अरुण मालुसरे, राष्ट्रीय बाल्मिकी सेनेचे राजेंद्र छाजछिडक, राष्ट्रीय बाल्मिकी सेना पक्षाचे पुरणचंद्र डिलान उपस्थित होते. तर मनसे, बसपाचे पदाधिकारी अनुपस्थित होते.

Web Title: When will the faulty voter turn up?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.