असुविधांची लागण थांबणार कधी? रुग्णांच्या नातेवाइकांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 04:16 AM2017-08-20T04:16:15+5:302017-08-20T04:16:18+5:30
महापालिकेकडून नागरिकांच्या सोईसाठी शहरात आठ मोठी रुग्णालये सुरू केली आहेत. मात्र, या रुग्णालयातील असुविधांमुळे रुग्णांना वायसीएमशिवाय पर्यायच उरत नाही. दिवसेंदिवस रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वायसीएममधील यंत्रणेवर ताण येत आहे.
पिंपरी : महापालिकेकडून नागरिकांच्या सोईसाठी शहरात आठ मोठी रुग्णालये सुरू केली आहेत. मात्र, या रुग्णालयातील असुविधांमुळे रुग्णांना वायसीएमशिवाय पर्यायच उरत नाही. दिवसेंदिवस रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वायसीएममधील यंत्रणेवर ताण येत आहे. याचाच प्रतिकूल परिणाम रुग्णांच्या उपचारावर होत आहे. रुग्णालय परिसरातील स्वच्छतेकडेही कर्मचा-यांचे दुर्लक्ष आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात वर्षाकाठी सुमारे ३० कोटींहून अधिक रुपयांची तरतूद यशवंतराव रुग्णालयासाठी केली जाते. मात्र, या रुपयांचा उपयोग रुग्णांना योग्य सेवा देण्यासाठी व्हावा, अशी शहरवासीयांची अपेक्षा असते. मात्र, अनावश्यक उपकरणांची सातत्याने होणारी खरेदी तसेच अत्यावश्यक साधन-सुविधांसाठी होणारी दिरंगाई यामुळे येथे येणाºया रुग्णांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एक्स-रे मशीन वारंवार नादुरुस्त असल्याने रुग्णांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळतात. शिवाय एक्स-रेसाठी आवश्यक असणाºया फ्रेमही अपुºया असतात. त्यामुळे अनेकवेळा रिपोर्ट मिळण्यास दिरंगाई होते. परिणामी पुढील उपचारास विलंब होतो. अपंग आणि चालता न येणाºया रुग्णांसाठी आवश्यक असणाºया व्हिलचेअरची संख्या कमी असल्याने रुग्णांना ताटकळत बसावे लागत आहे. खाटांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे अनेकवेळा अतिदक्षता विभागासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात रुग्णाला पाठविण्यात येते.
रुग्णालयातील स्वच्छतागृहांची स्थिती दयनीय आहे. स्वच्छतेअभावी येथील दुर्गंधी असाह्य होते. शिवाय इमारतीच्या डगमध्ये कचºयाचे साम्राज्य पहायला मिळत आहे.
रुग्णालयातून औषधांची दुकानदारी
रुग्णाला लिहून दिलेली औैषधे विशिष्ट दुकानातून घेण्याचा आग्रह काही डॉक्टरांकडून केला जातो. तसेच काही महागडी औैषधे रुग्णालयातूनच मिळणे आवश्यक आहे. मात्र ती बाहेरील मेडिकल स्टोअरमधून आणायला सांगितली जातात. वायसीएममध्ये येणाºया बहुतांश रुग्णांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. त्यामुळे अशा रुग्णांना महागडी औैषधे बाहेरून घेणे परवडत नाही. यावरून रुग्णांच्या नातेवाइकांकडून प्रशासनाकडे तक्रारीही केल्या आहेत. तरीही रुग्णालय प्रशासन अशा औैषधांची खरेदी का करत नाही व ठराविक मेडिकलमधून औैषध खरदीचा हट्ट कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.
डॉक्टरांवर राजकीय दबाव
डॉक्टरांवर वारंवार होणाºया हल्ल्याविरोधात येथील निवासी डॉक्टरांनी काही महिन्यांपूर्वी संप पुकारला होता. महापौैरांच्या आश्वासनानंतर संप मागे घेतला खरा; परंतु अद्यापही परिस्थिती ‘जैैसे थे’च आहे. तातडीक विभागात एका रुग्णासोबत आठ ते दहा लोक येतात. अशावेळी नातेवाइकांकडून उपचारासाठी दबाव आणला जातो. शिवाय एखाद्या गंभीर रुग्णावर उपचार होणे येथे शक्य नसल्याचे डॉक्टर सांगतात. तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांकडून राजकीय पुढाºयांमार्फत उपचार करण्यासाठी दबाव आणला जातो. अशातच संबंधित रुग्ण दगावला तर त्याचे खापर निवासी डॉक्टरांवर फोडले जाते.