'माफी मागण्याचा प्रश्नच कुठं येतो', आठवलेंनी केले राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 03:33 PM2022-03-01T15:33:59+5:302022-03-01T15:35:32+5:30
समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते.
पिंपरी : समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू होते, या राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या वक्तव्याने राज्यात गोंधळ उडाला आहे. या वक्तव्याचे सर्मथन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका विविध विकासकांच्या उद्घाटन करण्यासाठी आठवले आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला.
आठवले म्हणाले, '' शिवाजी महाराजांच्या संदर्भात राज्यपाल काय म्हटले, ते तपासायला हवे. मी वर्तमानपत्र वाचून जे समजले त्यावरून रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यावरून वाद सुरू झाला आहे. मला वाटते, राज्यपालांच्या व्यक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते. त्यांना रामदास स्वामी यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन होते. त्यावरून शिवरायांचे रामदास गुरू होते, असे संदर्भ आहेत.''
राज्यपालांनी माफी मागायला हवी का या प्रश्नांवर आठवले म्हणाले, '' माफी मागण्याचा प्रश्न कुठे येतो.'' असे राज्यपालांचे समर्थन केंद्रीय मंत्री आठवले यांनी केले.