रांग इथली संपणार कधी?

By admin | Published: December 22, 2016 02:06 AM2016-12-22T02:06:58+5:302016-12-22T02:06:58+5:30

नोटाबंदीच्या निर्णयाला ४० दिवस उलटून गेले, तरी बँक आणि एटीएमसमोरील रांंगा अद्याप कायम असल्याचे चित्र शहरात पाहायला

Where will the queue end? | रांग इथली संपणार कधी?

रांग इथली संपणार कधी?

Next

पिंपरी : नोटाबंदीच्या निर्णयाला ४० दिवस उलटून गेले, तरी बँक आणि एटीएमसमोरील रांंगा अद्याप कायम असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. बहुतांश बँकांची एटीएम कें द्र अपुुऱ्या नोटांमुळे बंदावस्थेतच आहेत. बाजारात खेळते चलन नसल्याने रोखीने व्यवहार करण्यावर आपोआप बंधने आली आहेत. त्यामुळे नागरिकांकडून कॅशलेस व्यवहारावर भर दिल्याचे दिसत आहे.
नोटाबंदीच्या निर्णयावेळी ५० दिवसांमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा दावा पंतप्रधानांनी केला होता. मात्र, ४० दिवसांनंतरही नवीन चलनी नोटांचा तुटवडा असल्याने परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. शहरातील बहुतांश एटीएम बंदच असल्याने नागरिकांनी बँक ांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, रिझर्व बँकेकडून पुरविण्यात येणाऱ्या नोटांची संख्या अपुरी असल्याने ग्राहकांना अपेक्षित रक्कम देण्यावर मर्यादा येत असल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
या सर्व गोंधळामध्ये चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. दैनंदिन खर्चासाठी पैसे काढायचे असतील, तर सकाळी आठपासूनच रांगेत उभे राहावे लागत आहे. जेणेकरून कामाला दांडी होणार नाही. मात्र बँका सुरू होण्याची वेळ साडेनऊची असते. प्रत्यक्षात मात्र व्यवहार सुरू होण्यासाठी अकरा वाजतात. त्यामुळे नोकरदार वर्गाला त्या दिवशी सुटीच घ्यावी लागत आहे. त्यामुळे बँक प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. गृहिणींंना स्वयंपाकघरातील बजेट सावरताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. मात्र, खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम बँकेमधून काढताना नाकीनऊ येत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, लग्नखरेदीच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
आयटी अभियंते झाले खूष
वाकड : नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहार करण्याची सवय नसलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या उलट कॅशलेस व्यवहार करणारे आयटी अभियंते मात्र खूष आहेत. हिंजवडी परिसराचे रूप आयटी कंपन्यांमुळे पालटले आहे.
येथील अभियंते मोठ्या प्रमाणात कॅशलेस व्यवहारच करत होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात
वाढ झाली आहे. परंतु परिसरातील ग्रामीण भागातील नागरिक नाराज आहेत. अनेकांकडे बँक खातेही नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिसरातील बँकांभोवती पैसे काढण्यासाठी नागरिक सकाळपासून गर्दी करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Where will the queue end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.