घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ताजी असतानाच पुण्यातील मोशीतही कोसळले होर्डिंग
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: May 16, 2024 06:02 PM2024-05-16T18:02:32+5:302024-05-16T18:02:59+5:30
हे होर्डिंग अधिकृत असल्याचे महापालिकेचे उपायुक्त संदीप खोत यांनी माहिती दिली....
पिंपरी : पिंपरी - चिंचवड शहरातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून मोशी येथे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. सुदैवाने यात जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेलं नाही. रस्त्याच्या कडेला असलेलं लोखंडी होर्डिंग सुदैवानं रस्त्यावर पडलं नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. हे होर्डिंग अधिकृत असल्याचे महापालिकेचे उपायुक्त संदीप खोत यांनी माहिती दिली.
पिंपरी- चिंचवड शहरातील मोशी येथे दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी वाऱ्यात रस्त्यालगत असलेलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळले. होर्डिंगखाली पार्क केलेल्या दुचाकी आणि टेम्पोचे नुकसान झाले आहे. नुकतेच, मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १६ जणांना मृत्यू झालेला आहे. या घटनेनंतर अवघ्या होर्डिंगचा विषय समोर आला आहे. पिंपरी- चिंचवड शहरातही अनधिकृत होर्डिंगचे ऑडिट करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान ही घटना घडली.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ताजी असतानाच पुण्यातील मोशीतही कोसळले होर्डिंग#moshi#punepic.twitter.com/1FnmFcxf1O
— Lokmat (@lokmat) May 16, 2024