चिठ्ठीतील आशिष शर्मा कोण?
By admin | Published: October 30, 2014 01:49 AM2014-10-30T01:49:59+5:302014-10-30T01:49:59+5:30
माङया आत्महत्येस अशिष शर्मा ही एकमेव व्यक्ती जबाबदार आहे, असा उल्लेख पंचशील ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अजय ईश्वरदास चोरडिया यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला
Next
पिंपरी : माङया आत्महत्येस अशिष शर्मा ही एकमेव व्यक्ती जबाबदार आहे, असा उल्लेख पंचशील ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अजय ईश्वरदास चोरडिया यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला असल्याची माहिती उघड झाली आहे. चोरडियांजवळ सापडलेली ही चिठ्ठी माध्यमांच्या हाती लागली असली, तरी या चिठ्ठीसंदर्भात अधिकृत माहिती देण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शविली आहे. तपास सुरू आहे, असे म्हणून कानावर हात ठेवले आहेत. अधिकृत दुजोरा दिला नसला तरी खंडनही केलेले नाही.
हॉटेलमध्ये असणा:या नोट पॅडच्या पानावर इंग्रजीत लिहिलेली ती चिठ्ठी आहे. पानावर हॉटेलचा लोगो आहे. या चिठ्ठीत अशिष शर्मा यांच्याविषयी लिहिलेला मजकूर असा आहे- माङया आत्महत्येस अशिष शर्मा ही एकमेव व्यक्ती जबाबदार आहे. त्यांनी माङो आयुष्य उध्वस्त केले. अन्य कोणालाही जबाबदार धरू नये. अशिषने माङयाकडून पाच कोटी रुपये व बाणोर येथील एक फ्लॅट घेतला. माङया आत्महत्येस फक्त तेच जबाबदार आहेत.
चिठ्ठीत उल्लेख केलेले आशिष शर्मा कोण, याचा तपास घेणो पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. अडीच वर्षापूर्वी आशिष शर्मा हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहत होते. चिठ्ठीतील उल्लेख त्यांच्याविषयी आहे का? तसे असेल तर त्यांचे आणि अजय चोरडिया यांचे नेमके काय संबंध होते? की चोरडिया यांच्याशी संबंध आलेले हे आशिश शर्मा व्यावसायिक किंवा अन्य क्षेत्रतील दुसरी कणी व्यक्ती आहे, याचाही खुलासा पोलिसांनी केलेला नाही. मात्र चोरडिया यांच्या आत्मह्तयेच्या संदर्भात सकृद्दर्शनी आशिष शर्मा हे नाव वादाच्या भोव:यात आहे.
या विषयी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त राजेंद्र माने म्हणाले, ‘‘अजय चोरडिया यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर अजूनही त्यांचे घरातील सदस्य विविध विधी करण्यात गुंतलेले आहेत. त्यामुळे सर्वाचे जबाब घेतलेले नाहीत. चिठ्ठीचाही एकत्रित तपास सुरू आहे.’’ (प्रतिनिधी)
मला या संदर्भात एक-दोन फोन आले आहेत. पण त्या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. पिंपरी-चिंचवडला अडीच वर्षापूर्वी आयुक्त म्हणून काम पाहिले. त्यानंतरच्या कालावधीत मी कोणालाही भेटलो नाही किंवा या शहराशी माझा काहीही संबंध राहिला नाही. जेवढा काळ मी पदावर होतो. त्या काळात मी जी कामे केली ती नियमात बसवून केली आहेत. त्यामुळे अशा कोणत्याही घटनेशी माझा संबंध नाही.
- आशिष शर्मा, संचालक,
महापारेषण व माजी आयुक्त पिंपरी- चिंचवड महापालिका
च्आत्महत्येपूर्वी एका सनदी अधिका:यास दूरध्वनी केला होता. मी आत्महत्या करणार आहे, अशी माहितीही त्यांना दिली होती. मात्र, संबंधित व्यक्तीने अजयचे म्हणणो गांभीर्याने घेतले नव्हते.
च्तेव्हा भेटू वैकुंठात असा संवाद झाला होता, अशी चर्चा होती. याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. चिंचवड येथील डबल ट्री हिल्टन या पंचतारांकित हॉटेलमध्ये सोमवारी दुपारी अजय चोरडिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.