तीन आसनी रिक्षा गेल्या कुणीकडे?
By admin | Published: February 13, 2017 01:36 AM2017-02-13T01:36:04+5:302017-02-13T01:36:04+5:30
महापालिका निवडणूक प्रचारासाठी अवघे सात दिवस राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुरळा उडाला आहे. पीएमपी बसस्थानकाला तीन आसनी
निगडी : महापालिका निवडणूक प्रचारासाठी अवघे सात दिवस राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुरळा उडाला आहे. पीएमपी बसस्थानकाला तीन आसनी रिक्षांचा गराडा असतो.
परंतु या तीन आसनी रिक्षा प्रचारयंत्रणेच्या रणधुमाळीमध्ये व्यस्त असल्याने बसस्थानकावर व पवळे उड्डाणपूल या ठिकाणी रिक्षांनी गजबजलेले ठिकाण मात्र मोकळे दिसत आहे. यामुळे या ठिकाणी असणाऱ्या रिक्षा नेमक्या गेल्या कुठे, असा प्रश्न या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पडत आहे. भौगोलिकदृष्ट्या प्रभागरचनेत मोठे बदल झाल्याने उमेदवारांसाठी प्रभाग मोठा बनला आहे.
साहजिकच प्रचारासाठी लागणाऱ्या वाहनांतही वाढ झाली आहे. उमेदवाराचे नाव व त्याला मिळालेले अधिकृत चिन्ह मतदारापर्पंत पोहचविण्यासाठी तीन आसनी रिक्षांची व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा वापर प्रचारासाठी वाढला आहे.
तीन आसनी वाहने एरवी चौकाचौकांत प्रवाशांची वाट पाहत असतात. परंतु सध्या महापालिका निवडणूक प्रचारात तीन आसनी रिक्षा गुंतल्याने प्रवाशांनाच रिक्षाची वाट पाहावी लागत आहे. मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांचा पथनाट्य व पोवाड्याद्वारे प्रचार करण्यासाठी वापर प्रचारासाठी अवघे आठ दिवस उरले आहेत. आपल्या पॅनलचा व निवडणूक चिन्हाचा प्रचार करण्यासाठी व प्रभागाचे नेतृत्व करण्यासाठी आपणच कसे योग्य आहोत, हे सिद्ध करण्यासाठी व मतदारांना आकर्षित करण्यासाठी मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांचा वापर पथनाट्य, पोवाड्याद्वारे प्रचार करण्यासाठी अशा वाहनांचा वापर होत आहे.
तसेच शहरातील अनेक उमेदवारांनी तीन आसनी रिक्षा बुक करुन ठेवल्या आहेत. या रिक्षांना दिवसभर प्रचाराचे साहित्य पोहोचविणे, कार्यकर्त्यांची ने-आण करणे यासारखी कामे दिली
आहेत. (वार्ताहर)