वडगाव मावळात पत्नीचा गळा आवळून खून; कोणाला कळू नये म्हणून मृतदेह लटकवला छताला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 04:47 PM2022-02-09T16:47:14+5:302022-02-09T16:47:30+5:30

पोलिसांनी खाक्या दाखवताच 'साब मुझे मत मारो मैने खून किया है' असे सांगत पतीने खून केल्याची कबुली दिली आहे.

Wife strangled to death in Wadgaon MawalThe body was hung on the ceiling so that no one would know | वडगाव मावळात पत्नीचा गळा आवळून खून; कोणाला कळू नये म्हणून मृतदेह लटकवला छताला

वडगाव मावळात पत्नीचा गळा आवळून खून; कोणाला कळू नये म्हणून मृतदेह लटकवला छताला

Next

वडगाव मावळ : वडगाव मावळात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला आहे. त्यानंतर कोणास काही समजु नये यासाठी तीच्या गळ्याला ओढणी बांधून लोंखडी अँगलला लटकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच 'साब मुझे मत मारो मैने खून किया है' असे सांगत पतीने खून केल्याची कबुली दिली आहे. 

सतरूपा सुनिल बंजारे (वय २४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तीचा पती सुनील रूपचंद बंजारे (वय २७,  विनायक गोपाळ सांबारे यांचे पाॅलिहाऊस, निगडे ता.मावळ मूळ गाव चुरतेला छत्तीसगड) याला अटक केली आहे 

वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडे हद्दीत विनायक गोपाळ सांबारे यांचे पाॅलिहाऊस आहे. तीथे  सुनील कामाला होता. त्याने कोणत्या तरी कारणावरून पत्नी सतरूप हीला मारहाण करून तिचा गळा दाबुन खून केला. कोणास समजु नये यासाठी तीच्या ओढणीच्या सहाय्याने खोलीतील छताच्या लोखंडी अँगलला लटकवुन तीने गळफास घेतला असल्याचा बनाव केला.

साब मुझे मत मारो;मैने खून किया है

 या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला. आरोपीला खाक्या दाखवण्याच तो 'साब मुझे मत मारो मैने ही खून किया है' असे म्हणत गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना ७ तारखेला घडली दोन दिवसात पोलिसांनी खूणाचा गुन्हा उघकीस आणत बनाव करणा-याला अटक करून गुन्हा दाखल केला. 
डीवायएसपी राजेंद्र पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास भोसले, उपनिरीक्षक विजय वडोद, अमोल कसबेकर, अमोल तावरे, श्रीशैल कंटोळी, मनोज कदम, सुनील मगर, सिध्दार्थ वाघमारे हे पुढील तपास करत आहेत. 

Web Title: Wife strangled to death in Wadgaon MawalThe body was hung on the ceiling so that no one would know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.