धम्मभूमीच्या विकासास गती मिळणार?

By admin | Published: December 25, 2015 01:41 AM2015-12-25T01:41:14+5:302015-12-25T01:41:14+5:30

२५ डिसेंबर १९५४ रोजी येथील बुद्ध मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्यांनी ब्रह्मदेशातील रंगून येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या

Will the development of the house be accelerated? | धम्मभूमीच्या विकासास गती मिळणार?

धम्मभूमीच्या विकासास गती मिळणार?

Next

देहूरोड : २५ डिसेंबर १९५४ रोजी येथील बुद्ध मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्यांनी ब्रह्मदेशातील रंगून येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या ऐतिहासिक घटनेला शुक्रवारी, दि. २५ रोजी ६१ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रथमच सर्वच लोकप्रतिनिधींनी बुद्धविहार विकासकामे करण्यासाठी संरक्षण विभागाकडून परवानगीबाबत सकारात्मक भूमिका घेत पाठपुरावा करण्यात येत असल्याने बुद्धविहाराच्या विकासाची प्रतीक्षा डॉ. बाबासाहेबांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ऐतिहासिक बुद्धविहाराचा डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा विस्तार व विकास करण्यात शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सरकारमधील जबाबदार घटकांनी (राज्याचे मंत्री, खासदार, आमदार) धम्मभूमीत येऊन तसे वक्तव्य केल्याने बौद्ध बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, बुद्धविहार कृती समिती व बुद्धविहार ट्रस्ट यांच्यात गेल्या काही दिवसांत होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे समाजबांधवांत संभ्रम निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे.
येथील बुद्ध मंदिरात डॉ. आंबेडकर यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची विधिपूर्ण प्रतिष्ठापना २५ डिसेंबर १९५४ रोजी करण्यात आली. १२०० वर्षांनंतर भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्याचा पहिला मान देहूरोडला मिळाला असल्याचे डॉ. आंबेडकर यांनी या वेळी झालेल्या भाषणात नमूद केले होते. या वेळी शंकरराव खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना समारंभाला ४० हजारांहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता. स्थानिक कार्यकर्ते दिवंगत लक्ष्मण रोकडे, हरीश चौरे उपस्थित होते.
या वेळी डॉ. आंबेडकर यांनी हे जे देऊळ बांधण्यात आले आहे, ते अत्यंत आहे. ते जर आपण आहे, त्या स्थितीत ठेवाल, तर आपल्याला काळिमा लागेल. या देवळाला एक हॉल पाहिजे. प्रदक्षिणा करण्यासाठी जागा हवी आहे. तुम्ही सर्वांनी वर्गणी गोळा करून या मंदिराला भव्य स्वरूप देण्याचा प्रयत्न करावा. मात्र, भगवंताच्या नावावर जमा केलेला पैसा खाऊ नका, असा सल्ला दिला होता. आजचा प्रसंग इतिहासात नोंदला जाईल. १२०० वर्षांनंतर भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्याचा पहिला मान आपल्याला मिळाला आहे. याचे सारे श्रेय आपल्यालाच आहे, म्हणून धन्यता मानली पाहिजे.
डॉ. आंबेडकरांनी स्वत: बुद्ध मूर्तीची स्थापना केली असल्याने दर वर्षी राज्यातून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला लाखो बौद्धबांधव येत असतात. वर्षभर भेट देणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र, या स्थळाच्या विकासासाठी राज्य शासनाने मोठ्या निधीच्या घोषणा करण्याव्यतिरिक्त काहीही प्रयत्न केले नव्हते. डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत वास्तू निर्माण करण्याचे प्रयत्न दिसत नव्हता. बुद्धविहार व धम्मभूमीचा जीर्णोद्धार व्हावा, धम्मपीठ व्हावे, देशोदेशीच्या बौद्ध उपासकांनी भेट द्यावी आणि धम्मभूमीचे नाव सर्वदूर अजरामर व्हावे असे रोकडे, चौरे व त्यांच्या सहकाऱ्यांना वाटत होते. (वार्ताहर)

Web Title: Will the development of the house be accelerated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.