लोणावळा शहर बेकायदा व्यवसायमुक्त करणार : पाेलीस निरीक्षक बी. आर.पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 01:42 PM2018-12-18T13:42:15+5:302018-12-18T13:44:49+5:30
पर्यटनाचे मुख्य ठिकाण असलेल्या लोणावळा शहरातून बेकायदा व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्याचा निर्धार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर.पाटील यांनी केला आहे.
लोणावळा : पर्यटनाचे मुख्य ठिकाण असलेल्या लोणावळा शहरातून बेकायदा व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्याचा निर्धार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर.पाटील यांनी केला आहे. याकरिता लोणावळेकर नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात कोठेही मटका, जुगार, बेकायदा दारु विक्री, रमी किंवा पत्ते खेळण्याचा क्लब, ओपन बार, पिटा अॅक्ट (वेश्या व्यवसाय) किंवा अन्य कोणताही बेकायदा धंदा सुरु असल्यास त्याबाबत नागरिकांनी माहिती कळवावी. माहिती देणार्याची ओळख गुप्त ठेवत संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असे पाटील यांनी सांगितले. लोणावळा शहरात सध्या ई पेट्रोलिंगच्या माध्यमातून सर्व परिसरात वाॅच ठेवण्याचे काम सुरु आहे. असे असताना देखील काही अवैध व्यावसाय करणारे रेल्वे स्थानक परिसर, बस स्थानक तसेच निर्जंन स्थळांचा आसरा घेत लपून छपून व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात. त्यांवर निर्बंध घालत त्यांना शहरातून पुर्णपणे हद्दपार करण्याकरिता नागरिकांचे सहकार्य देखिल महत्वाचे असल्याने पोलीस प्रशासन व नागरिक यांच्या संयुक्त सहकार्यातून लोणावळा शहर अवैध धंदेमुक्त करण्याचा मानस करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी सांगितले.