महापालिकेच्या रोपवाटिका बंद पडणार?
By admin | Published: July 8, 2015 02:09 AM2015-07-08T02:09:01+5:302015-07-08T02:09:01+5:30
निगडी सेक्टर २७ येथील रोपवाटिकांच्या संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या रोपवाटिकेत २५ हजार रोपे सध्या आहेत. त्या रोपाना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणे गरजेचे आहे.
निगडी सेक्टर २७ येथील रोपवाटिकांच्या संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या रोपवाटिकेत २५ हजार रोपे सध्या आहेत. त्या रोपाना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणे गरजेचे आहे. उद्यान विभागाच्या गुलाबपुष्प रोपवाटिकेतही फक्त शहरातील सुशोभीकरणासाठी असलेली
झाडेच शिल्लक आहेत. या ठिकाणाहून विक्री केली जात नाही. काही रोपे आजतागायत विक्रीसाठी व सुशोभीकरणासाठी ठेकेदारांकडूनच मागविली जात आहेत. ती रोपे महापालिका उद्यान विभाग तयार करण्याचे धैर्यच दाखवीत नाही. रोपांसाठी लागणारी खते, कीटकनाशके व मातीचा कस
यांमध्ये संदिग्धता निर्माण होत आहे. रोपवाटिकेतच गांडूळ खत व कंपोस्ट खत रोपांसाठी तयार केले जाते. रोपांसाठी लागणारी पोयटा माती ही टेंडर पद्धतीने मागविली जाते.
निगडीतील रोपवाटिकेत उद्यान सहायक हे पद सध्या रिक्त आहे. तसेच, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, रोपे विक्रेता, सहायक, वाहनचालक, सफाई कामगार, स्त्री मजूर, माळी, प्लंबर, मजूर ही पदे सध्या आहेत. मात्र, उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा येत आहे. अ प्रभागासाठी २५ कर्मचारी सध्या आहेत. महापालिकेत उद्यान कामासाठी वाहनांची कमतरता भासत आहे. वाहनचालकांची संख्या अपुरी आहे. तीन प्रभाग मिळून एक वाहनचालक आहे. रोपवाटिकेतील कामे व महापालिका उद्यानाची देखभाल दुरुस्ती, वृक्षारोपण तसेच प्रभाग अंतर्गत कामे वेळेत पूर्ण होत नाहीत.
सध्या रोपवाटिकेत शोभिवंत झाडांबरोबरच आष्ौधी झाडे आहेत. तसेच, गोल्डन दुरांडा, अरेलिया, बोगनवेल, तुळस, आंबा, फणस, फायकस, जास्वंद, कडुनिंब, चिंच, करंज, रेनट्री, मोहगणी, बांबू, गुलमोहर, अडूळसा, केशिया, बदाम, गुलमोहर, जांभूळ, चाफा ही रोपे ५ रुपयांपासून ते २५ रुपयांपर्यंत आहेत. ही रोपे १ फुटापासून ते ४ फुटांपर्यंत आहेत. मात्र, बरीच रोपे रोपवाटिकेत उपलब्धच नसतात. ग्राहकांच्या मागणीनुसार रोपे मिळत नाहीत.
कमी, जास्त, मध्यम रोपांसाठी ब्लॉक हवेत. तसेच आष्ौधी, देशी, विदेशी फुले व फळझाडांसाठी
कॉलम असणे गरजेचे आहे. रोपवाटिकेत चांगल्या दर्जाचा
रस्ता हवा. रस्त्याअभावी
रोपवाटिकेत पावसाळ्यात पाय टाकणे अडचणीचे होत आहे. रोपवाटिकेतील रोपांचे नियोजन हवे. कर्मचारी व अधिकारी यांमध्ये एकसूत्रता असणे गरजेचे आहे. या अभावामुळे याचा परिणाम रोपवाटिकेवर दिसून येत आहे.
पालिकेचा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असणाऱ्या रोपवाटिकेला अवघ्या काही हजारांवर वार्षिक उत्पन्न मिळत आहे. ही रोपे शाळा, महाविद्यालये, संस्था, कंपन्यांना कमी दराने दिली जातात. मात्र, प्रचार-प्रसाराअभावी रोपांचा खप कमी होत आहे. महापालिकेला गतवर्षी रोपांची झालेली विक्री व त्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न अत्यल्प आहे.