PCMC| २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात उत्पन्नवाढीचे प्रयत्न होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 02:19 PM2022-02-18T14:19:15+5:302022-02-18T14:25:31+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नावर कोरोना महामारीमुळे परिणाम झालेला आहे...

will there be an effort to increase income in the budget 2022-33 pcmc | PCMC| २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात उत्पन्नवाढीचे प्रयत्न होणार का?

PCMC| २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात उत्पन्नवाढीचे प्रयत्न होणार का?

Next

पिंपरी : महापालिकेचा सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त राजेश पाटील शुक्रवारी सकाळी अकरा वाजता स्थायी समितीला ऑनलाइन पद्धतीने सादर करणार आहेत. महापालिकेचा ४० वा, सत्ताधारी भाजपचा पाचवा आणि आयुक्तांचा हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्पात उत्पन्नवाढीचे प्रयत्न होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नावर कोरोना महामारीमुळे परिणाम झालेला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात नव्या उत्पन्न स्रोतांचा अभाव यामुळे आयुक्तांच्या पोतडीत कोणते नवीन प्रकल्प, योजना असतील, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या वतीने अर्थसंकल्प तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. स्थायी समितीमार्फत चर्चा करून अर्थसंकल्प मंजूर करण्यात येईल. त्यानंतर तो महापालिका विशेष सभेपुढे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.

अर्थसंकल्पात जेएनएनयूआरएमसह स्मार्ट सिटी, अमृत योजना, स्वच्छ भारत योजनांचा समावेश आहे. अर्थसंकल्पात उत्पन्नवाढीचे प्रयत्न होणार का?  याबाबत उत्सुकता आहे.

Web Title: will there be an effort to increase income in the budget 2022-33 pcmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.