विनानिविदाच कचऱ्याचा ठेका

By admin | Published: May 11, 2017 04:42 AM2017-05-11T04:42:53+5:302017-05-11T04:42:53+5:30

पिंपरी-चिंचवड शहराच्या सहा प्रभाग क्षेत्रांतील कचरा गोळा करणे, त्याची कचरा डेपोपर्यंत वाहतूक करणे या कामाचा ठेका विनानिविदा

Winnie the waste deal | विनानिविदाच कचऱ्याचा ठेका

विनानिविदाच कचऱ्याचा ठेका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या सहा प्रभाग क्षेत्रांतील कचरा गोळा करणे, त्याची कचरा डेपोपर्यंत वाहतूक करणे या कामाचा ठेका विनानिविदा एकाच ठेकेदाराला बहाल केला आहे. अधिकारी आणि ठेकेदाराच्या संगनमतामुळे गेली सहा वर्षे निविदा प्रक्रियाच राबविली नाही. ठेकेदाराला दर वर्षी पाच टक्के दरवाढ देत सलग चार वर्षे मुदतवाढ दिली. आरोग्य विभागाने यंदाही ठेकेदाराला पुन्हा चार महिने मुदतवाढ मिळावी, असा घाट घातला आहे. निविदा प्रक्रियेला विलंब होईल, असे सांगून चार कोटी ५५ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे.
महापालिका हद्दीत दररोज ७४५ टन कचऱ्याची निर्मिती होते. मोशी कचरा डेपोच्या ८१ एकरावर या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. कचरा वाहतुकीसाठी ४२३ वाहनांचा वापर केला जातो. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घरोघरचा कचरा गोळा करणे, मोशी कचरा डेपोपर्यंत त्याची वाहतूक करणे या कामासाठी २०११-१२ मध्ये देशपातळीवर निविदा काढली. महापालिकेने ब आणि क प्रभागासाठी बीव्हीजीला ठेका दिला. प्रथम वर्षासाठी प्रतिटन ७१४ रुपये व त्यापुढील प्रत्येक वर्षासाठी पाच टक्के दरवाढीस मान्यता दिली होती.
अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने वर्षासाठी पाच टक्के दरवाढ हा नियम कायम ठेवून संबंधित कंपनीलाच दर वर्षी कामाचा ठेका दिला. मुदत संपल्यानंतर नव्याने निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे असताना पाच टक्के दरवाढ दिली आहे. २०१६ मध्येही पाचव्या
वर्षासाठी प्रतिटन ८६८ रुपये दरवाढीस मान्यता देऊन ब, क आणि ई प्रभागातील प्राथमिक आणि द्वितीय टप्प्यातील कचरा गोळा करण्याचे काम दिले. तसेच अ, ड आणि फ प्रभागातील दुसऱ्या टप्प्यातील कचरा गोळा करण्याच्या कामाचाही ठेका दिला आहे. त्यामध्ये कॉम्पॅक्टरसाठी ६३७ रुपये आणि ट्रकसाठी ७६४ रुपये दर ठरविला आहे. या कामाची मुदत संपुष्टात आल्यावरही आरोग्य विभागाने पुन्हा ३० एप्रिल १७ पर्यंत मुदतवाढ दिली.

Web Title: Winnie the waste deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.