ई प्रभागात लांडगे गटाचे वर्चस्व
By Admin | Published: April 7, 2016 12:35 AM2016-04-07T00:35:10+5:302016-04-07T00:35:10+5:30
महापालिकेच्या सहाही प्रभागांच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये अ प्रभागातून नीलेश पांढारकर, ब प्रभागातून आशा सूर्यवंशी, क प्रभागातून शैलजा शितोळे, ड प्रभागातून अरुण
पिंपरी : महापालिकेच्या सहाही प्रभागांच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये अ प्रभागातून नीलेश पांढारकर, ब प्रभागातून आशा सूर्यवंशी, क प्रभागातून शैलजा शितोळे, ड प्रभागातून अरुण टाक, फ प्रभागातून मंदाकिनी ठाकरे, ई प्रभागातून श्रद्धा लांडे यांची बिनविरोध निवड झाली. सहाही प्रभागांत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. ई प्रभागात आमदार महेश लांडगेंचे वर्चस्व असल्याचे दिसून आले.
सहा प्रभागाध्यक्षांची निवडणूक जाहीर केल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काय होणार, याबाबतची चर्चा महापालिका वर्तुळात होती. कोणत्या गटांना संधी देणार? कोणाला डावलणार, याबाबत चर्चा रंगली होती. ई प्रभागात नक्की कोणत्या गटाला प्राधान्य देणार? निवडणूक होणार की ही निवड बिनविरोध होणार, याबाबत प्रचंड उत्सुकता होती. पालिका इमारतीत प्रभागाध्यक्षांसाठी निवडणूक झाली. या वेळी अ प्रभागातून नीलेश पांढारकर, ब प्रभागातून आशा सूर्यवंशी, क प्रभागातून शैलजा शितोळे, ड प्रभागातून अरुण टाक व फ प्रभागातून मंदाकिनी ठाकरे यांचे एक-एकच अर्ज आल्यामुळे यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, ई प्रभागाध्यक्षपदासाठी २ अर्ज आल्याने उत्सुकता निर्माण झाली.(प्रतिनिधी)