टाकी फुटून महिलेचा मृत्यू; तीन महिला जखमी, मुळशीतील घटना
By रोशन मोरे | Updated: April 25, 2023 16:13 IST2023-04-25T16:11:24+5:302023-04-25T16:13:23+5:30
सिमेंटच्या टाकीचे निकृष्टदर्जाचे काम करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

टाकी फुटून महिलेचा मृत्यू; तीन महिला जखमी, मुळशीतील घटना
पिंपरी : लेबर कॅम्पमधील पाण्याच्या टाकी फूटून एका महिलेचा मृत्यू झाला तर, एक तीन महिला जखमी झाल्या आहे. त्यातील महिला गंभीर आहे. ही घटना सोमवारी (दि.२४) व्हिजे लेबर कॅम्प, माणगाव, मुळशी येथे घडली. या प्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी टँकरवरील चालक नाशे तान्हाजी अहिवले, लेबर कॅम्प सुपरवाईजर समीर शेख, टाकीचे काम करणारा गुणवंत नथु राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिची बहिण सिमेंटच्या नवीन टाकी समोर भांडी, कपडे धुत होते. मात्र, अचानक टाकी फुटून एक महिलेचा मृत्यू झाला तर एका महिलेला गंभीर दुखापत झाली. तर, फिर्यादी आणि तिची बहीण किरकोळ जखमी झाले. आरोपी गुणवंत राणे यांनी हयांनी हयगीने व निष्काळजीने टाकीचे काम निकृष्टदर्जाचे केले. तर, नागेश अहिवळे यांनी तब्बल ती टँकर पाण्याचा साठा टाकीत भरला आणि यावर लेबर कॅम्पवर मॅनेजर समीर शेख यांनी लक्ष ठेवण्याची आवश्यकता असताना कामात निष्काळजी पणा केला. तसेच अपघात होण्याची शक्यता असताना देखील कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर इतर महिला जखमी झाल्या, असे फिर्यादीत नमूद आहे.