पिंपळे निलखमध्ये कामावर घेण्यास नकार दिल्याने गैरवर्तन करत महिलेचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 10:02 IST2022-08-01T10:01:17+5:302022-08-01T10:02:21+5:30
पिंपरी : कामावर घेण्यास नकार दिल्याने गैरवर्तन करत महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली. पिंपळे निलख येथे ...

पिंपळे निलखमध्ये कामावर घेण्यास नकार दिल्याने गैरवर्तन करत महिलेचा विनयभंग
पिंपरी : कामावर घेण्यास नकार दिल्याने गैरवर्तन करत महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली. पिंपळे निलख येथे रविवारी (दि. ३१) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
रितेश रोहिदास सातसमुद्रे (वय २०, रा. बालेवाडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेच्या शाॅपवर जानेवारी २०२२ पासून कामास होता. त्याला १४ जुलैपासून कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर तो पुन्हा रविवारी (दि. ३१) फिर्यादी महिलेच्या शॉपवर आला. कामावर पुन्हा घेण्याची विनंती त्याने केली. मात्र फिर्यादीने त्यास नकार दिला.
त्यानंतर फिर्यादी फ्लॅटवर गेल्या असता आरोपी फिर्यादीच्या पाठीमागून फ्लॅटवर गेला. तेथे गैरवर्तन करत फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य आरोपीने केले, असे फिर्यादीत नमूद आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम तपास करीत आहेत.