हक्कासाठी महिला रस्त्यावर
By admin | Published: July 2, 2017 02:49 AM2017-07-02T02:49:17+5:302017-07-02T02:49:17+5:30
रिंगरोड प्रकल्पासाठी प्राधिकरण कार्यालयाकडून रिंगरोडला बाधित ठरणाऱ्या ज्या मिळकती आहेत, त्या मिळकतधारकांना कारवाईच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : रिंगरोड प्रकल्पासाठी प्राधिकरण कार्यालयाकडून रिंगरोडला बाधित ठरणाऱ्या ज्या मिळकती आहेत, त्या मिळकतधारकांना कारवाईच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी तसेच हक्काची घरे वाचवण्यासाठी ‘घर बचाओ संघर्ष समिती’च्या वतीने काळेवाडीत महिलांचा मेळावा घेण्यात आला. यामध्ये थेरगाव, बिजलीनगर, पिंपळे गुरव, निगडी, काळेवाडी येथील महिला सहभागी झाल्या.
काळेवाडी, थेरगाव रस्त्यावर धनगर बाबा मंदिराजवळ घेण्यात आलेल्या मेळाव्यात महिलांनी घरे वाचविण्यासाठी प्रशासनाविरोधात संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. रिंगरोडला पर्यायी रस्ता असतानाही सर्वसामान्यांच्या घरावर प्रशासन का कारवाई करीत आहे? ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी जायचे कोठे? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.