पिंपरी-चिंचवडमध्ये घरात झोपलेल्या महिलेचा विनयभंग करून केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 17:46 IST2022-03-24T17:45:26+5:302022-03-24T17:46:05+5:30
फिर्यादी महिला व तिच्या आईला शिवीगाळ करून मारहाण...

पिंपरी-चिंचवडमध्ये घरात झोपलेल्या महिलेचा विनयभंग करून केली मारहाण
पिंपरी : घरात झोपलेल्या महिलेचा विनयभंग केला. तसेच पीडित महिलेला व तिच्या आईला शिवीगाळ करून मारहाण केली. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी येथे बुधवारी (दि. २३) रात्री एक व सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
पीडित महिलेने याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विनोद गणेश जाधव (वय २५, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या घरात झोपली असताना आरोपी घरात आला. त्याने फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न करून विनयभंग केला.
याचा जाब फिर्यादी महिलेच्या आईने विचारला. त्या कारणावरून आरोपीने फिर्यादी महिला व तिच्या आईला शिवीगाळ करून मारहाण केली.