पिंपरीत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावली महिलेची सोनसाखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 13:56 IST2021-03-10T13:55:48+5:302021-03-10T13:56:04+5:30
दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने खेचून चोरून नेली.

पिंपरीत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावली महिलेची सोनसाखळी
पिंपरी : दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी महिलेची ५५ हजार १०० रुपयांची सोनसाखळी जबरदस्तीने खेचून चोरून नेली. संत तुकाराम नगर, पिंपरी येथे मंगळवारी (दि. ९) रात्री सव्वानऊच्या सुमारास जबरी चोरीचा हा प्रकार घडला.
सुषमा महिंद्र मोरे (वय ३६, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त केक खरेदी करण्यासाठी मैत्री चौकातून वल्लभनगरच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने खेचून चोरून नेली.