Pimpri Chinchwad Crime: सोबत चोरी करायला नकार दिल्याने महिलेचे पाडले दात
By रोशन मोरे | Updated: November 25, 2023 18:27 IST2023-11-25T18:26:08+5:302023-11-25T18:27:06+5:30
ही घटना मंगळवारी (दि.२१) पिंपरीतील संजय गांधीनगर येथे घडली...

Pimpri Chinchwad Crime: सोबत चोरी करायला नकार दिल्याने महिलेचे पाडले दात
पिंपरी : सोबत चोरी करण्यासाठी येण्यास महिलेने नकार दिला. त्याचा राग आल्याने महिलेला मारहाण करत तिचे दात पाडले. ही घटना मंगळवारी (दि.२१) पिंपरीतील संजय गांधीनगर येथे घडली. या प्रकरणी महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.२४) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सुभाष उर्फ चेंड्या मनोज टाक (वय ४५, रा. सुभाषनगर, पिंपरी) याला अटक केली.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला हिने तिचा मित्र संशयित सुभाष याने त्याच्याबरोबर चोरी करण्यासाठी नकार दिला. संशयिताने महिलेकडे पैशांची मागणी केली. मात्र, महिलेने त्यास नकार दिल्याने संशयित सुभाष याने चिडून महिलेस मारहाण केली. या मारहणीत महिलेचे चार दात संशयिताने पाडले. तसेच हातावर मारून हात फॅक्चर केला. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.