आत्महत्याप्रकरणी महिलांना अटक

By admin | Published: June 30, 2017 03:50 AM2017-06-30T03:50:32+5:302017-06-30T03:50:32+5:30

लोणावळ्याजवळील क्रांतिनगर, ओळकाईवाडी येथे कुटुंबासह राहणारे बबन जयवंत धिंदळे (वय ३८) यांना मानसिक त्रास देऊन

Women arrested for suicides | आत्महत्याप्रकरणी महिलांना अटक

आत्महत्याप्रकरणी महिलांना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : लोणावळ्याजवळील क्रांतिनगर, ओळकाईवाडी येथे कुटुंबासह राहणारे बबन जयवंत धिंदळे (वय ३८) यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दोन महिलांना अटक केली असून एक फरार आहे.
ताहिरा अजीज शेख (वय ४०) व रजिया मेहबूब शेख (वय ३७, दोघेही रा. क्रांतिनगर, ओळकाईवाडी, लोणावळा) यांना अटक केली असून मुबीन मेहबूब शेख हा आरोपी अद्यपी फरार आहे. बबन धिंदळे यांच्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्या मुबीन मेहबूब शेख या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून वरील तिन्ही आरोपींनी संगनमताने धिंदळे आणि त्याची पत्नी दीपाली यांना मानसिक त्रास दिल्याने त्याला कंटाळून बबन धिंदळे यानी आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांच्या भावाने दिली आहे.

Web Title: Women arrested for suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.