स्त्रिया, दलितांना हवे ख-या अर्थाने स्वातंत्र्य - सुभाष वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:44 AM2018-01-05T02:44:43+5:302018-01-05T02:45:02+5:30

राज्यघटनेने सर्वांना समान स्वातंत्र्य प्रदान केले आहे. समाजात स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सर्वांत आधी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला होता, हे दुर्लक्षून चालणार नाही. स्त्रिया व दलितांना खºया अर्थाने स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी केले.

 Women, dalitas want freedom in full sense - Subhash Vaare | स्त्रिया, दलितांना हवे ख-या अर्थाने स्वातंत्र्य - सुभाष वारे

स्त्रिया, दलितांना हवे ख-या अर्थाने स्वातंत्र्य - सुभाष वारे

googlenewsNext

तळेगाव दाभाडे - राज्यघटनेने सर्वांना समान स्वातंत्र्य प्रदान केले आहे. समाजात स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सर्वांत आधी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला होता, हे दुर्लक्षून चालणार नाही. स्त्रिया व दलितांना खºया अर्थाने स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बहि:शाल विभाग, ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष आणि तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित ‘स्वातंत्र्याची जाणीव’ या विषयावरील व्याख्यानात सुभाष वारे बोलत होते.
या वेळी प्राचार्य डी. डी. बाळसराफ, उपप्राचार्य डॉ. संभाजी मलघे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातील डॉ. भौमिक देशमुख, इंद्रायणी फार्मसी विभागाचे प्राचार्य बी. बी. जैन, प्रा. एस. एन. शिंदे, बहि:शाल केंद्र कार्यवाह डॉ. संदीप कांबळे, प्रा. के. व्ही. अडसूळ, प्रा. राजेंद्र आठवले, प्रा. दीप्ती पेठे, प्रा. सत्यम सानप, प्रा. मधुकर देशमुख, प्रा. स्मिता भेगडे, प्रा. सोनल चव्हाण, प्रा. विद्या भेगडे, प्रा. दिगंबर मोहोळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. के. मलघे होते.
वारे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य हा संविधानाचा गाभा आहे. संविधानातील ‘संधीची समानता’ हा शब्द स्वातंत्र्याची जाणीव या दृष्टीने महत्त्वाचा आहे. विरोधकांचा तर्क लक्षात घेऊन आपली भूमिका ठरवावी लागते. स्वातंत्र्यामुळेच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधला जातो. आज व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येताना दिसत आहे. स्वातंत्र्याचा आपल्याला विसर पडत चालला आहे. शेतकºयांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. माणसाला समाज वाचता आला, तर काहीही अशक्य नाही. ’’
डॉ. भौमिक देशमुख यांनी ‘आदिवासींच्या स्वातंत्र्याची जाणीव’ या विषयावर विचार व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. बाळसराफ यांनी स्वातंत्र्याची जाणीव, संकल्पना आणि स्वरूप या विषयाचा आढावा घेतला. सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी, तर आभार उपप्राचार्य डॉ. मलघे यांनी मानले.

आदिवासी समाज या देशातला पहिला निवासी समाज आहे. या समाजाने समाजसुधारणेसाठी कायमच मोठे योगदान दिले आहे. आदिवासी लोकांची मानसिकता कायम स्वातंत्र्यप्रेमी राहिली आहे. स्वातंत्र्याच्या कामी आदिवासींची भूमिका निर्णायक राहिली आहे. या समाजाबद्दल म्हणावे तितके लेखन झालेले नाही. याविषयी अधिक संशोधन व लेखन होण्याची आवश्यकता आहे.
- डॉ. भौमिक देशमुख

आरक्षणाविषयीचे फक्त नियम बनवून चालत नाहीत, तर ते अमलातही आणण्याची आवश्यकता आहे. संविधान हे एक मूल्यव्यवस्था देणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत की, फक्त संसद, फक्त न्यायालय, फक्त कायदा नागरिकांना मूलभूत हक्कांची शाश्वती देऊ शकत नाही. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेचे व्यवस्थित आकलन करून घेतले पाहिजे.
- प्रा. सुभाष वारे, सामाजिक कार्यकर्ते

Web Title:  Women, dalitas want freedom in full sense - Subhash Vaare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.