भोसरीत गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटातील जखमी महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 08:53 PM2019-12-08T20:53:12+5:302019-12-08T20:54:25+5:30
लाईटरने गॅस पेटवत असताना भडका होऊन झाला होता स्फोट
पिंपरी : सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या शिक्षिकेचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला आहे. भोसरी येथे बुधवारी (दि. ४) सकाळी पावणेसातच्या सुमारास स्फोट झाला होता.
मनीषा ज्ञानेश्वर साळुंखे (वय ३५,रा. भोसरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मनीषा या दिघी रस्ता येथील एका शाळेत शिक्षिका आहेत. तर, त्यांचे पती ज्ञानेश्वर साळुंचे हे चाकण येथील एका कंपनीत नोकरी करतात. साळुंखे यांच्याकडे दोन सिलींडर आहेत. त्यापैकी एका सिलींडरमधील गॅस संपल्याने साळुंखे यांनी मंगळवारी रात्रीच गॅस भरलेला सिलींडर शेगडीला जोडला. रात्री सिलींडरमधून गॅसगळती झाली. बुधवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर मनीषा यांनी गॅस सुरू करण्यासाठी लाईटरचा वापर केला. लाईटरने गॅस पेटवत असताना भडका होऊन स्फोट झाला. यामध्ये मनीषा गंभीररीत्या भाजल्या. तसेच त्यांचे पती ज्ञानेश्वर हे देखील यात भाजले. तर त्यांचा १३ वर्षांचा मुलगा सिद्धेश किरकोळ जखमी झाला होता.