स्वयंपाक येत नसल्याने सासरच्यांकडून विवाहितेचा छळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 19:35 IST2019-06-22T19:28:45+5:302019-06-22T19:35:05+5:30
स्वयंपाक येत नसल्याचे कारण करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासऱ्यांसह नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वयंपाक येत नसल्याने सासरच्यांकडून विवाहितेचा छळ
पिंपरी : स्वयंपाक येत नसल्याचे कारण करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासऱ्यांसह नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार सत्यनारायण गणपती मोटुरु (वय ३४), गणपती मोटुरु (वय ६८), सत्यवती गणपती मोटुरु (वय ५९) व हेमलता राजशेखर (वय ४०) यांच्याविरोधात हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेला तिच्या पतीने किरकोळ कारणावरुन शिवीगाळ करीत घरातून बाहेर हो, अशी धमकी देऊन घराबाहेर काढले. तसेच तिच्या सासू-सासऱ्यांनी तिला स्वंयपाक येत नाही म्हणून शिवीगाळ केली तर नणंदे राजशेखर यांनी तू माहेरहून कपडे, दागिने व दीड लाख रुपये घेवून ये म्हणून शारीरिक व मानसिक त्रास दिला.