विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासरच्यांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:38 AM2017-11-29T11:38:08+5:302017-11-29T11:43:15+5:30

चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा मानसिक शारीरिक छळ करून तिला विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सासू, सासरे, दीर, जाऊ यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

women suicide; complaint filed against husband in Wakad police station | विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासरच्यांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासरच्यांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देचारित्र्याच्या संशयावरुन कल्पना गायकवाड यांचा सासरच्यांकडून शारीरिक, मानसिक छळमृत कल्पनाच्या आईने वाकड पोलिसांत दिली फिर्याद

वाकड : चारित्र्यावर संशय घेऊन दोन वर्षांपासून विवाहितेचा मानसिक शारीरिक छळ करून तिला विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सासू, सासरे, दीर, जाऊ यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि २७) घडली.
कल्पना उर्फ निशा सिद्धार्थ गायकवाड (वय ३०, रा. रमाबाई आंबेडकर कॉलनी, वाकड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेची नाव असून मृत महिलेच्या आई सुशिला ज्ञानदेव भोसले (वय ५५, रा झफराबाद, जालना) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर पती सिद्धार्थ सोमनाथ गायकवाड, सासू पद्मिनी सोमनाथ गायकवाड, सासरा सोमनाथ गायकवाड, दीर श्याम सोमनाथ गायकवाड, जाऊ आशा श्याम गायकवाड (रा. सर्वजण रमाबाई आंबेडकर कॉलनी, वाकड रोड, वाकड) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहा वर्षांपूर्वी कल्पना यांचा सिद्धार्थ याच्याशी विवाह झाला होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पतीसह सासू, सासरे, दीर, जाऊ हे सर्वजण चारित्र्यावर संशय घेऊन कल्पना यांचा मानसिक, शारीरिक छळ करायचे. या छळाला कंटाळून त्यांनी रविवारी विषारी औषध घेतले. हे समजताच सासरच्यांनी एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले. दरम्यान आणखी दोन रुग्णालये बदलली, मात्र सोमवारी त्यांचे निधन झाले. त्यांना दोन अपत्य आहेत. मंगळवारी त्यांच्या आईने पोलिसांत धाव घेतल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक मोहन जाधव पुढील तपास करीत आहेत.

Web Title: women suicide; complaint filed against husband in Wakad police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.