महिलेच्या नकळत व्हिडीओ काढला; तृतीयपंथीयांच्या गाण्यावर त्याला डब केला; पिंपरीत तिघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 02:26 PM2021-07-08T14:26:01+5:302021-07-08T14:26:34+5:30
वायसीएम रुग्णालयाच्या डेड हाऊस समोर रविवारी दुपारी हा प्रकार घडला आहे.
पिंपरी : महिलेच्या नकळत व्हिडीओ काढून त्याला तृतीय पंथीयांच्या गाण्यावर डब केल्याचा प्रकार घडला आहे. वायसीएम रुग्णालयाच्या डेड हाऊस समोर रविवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेले नाही.
दत्तात्रेय गोळे, महेश अमराळे, शरीफ ( पूर्ण नाव माहीत नाही.) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेचा नकळत व्हिडीओ घेऊन त्यासोबत छेडछाड करून तो तृतीपंथीयांच्या गाण्यावर डब केला. फिर्यादी महिलेने तीन वर्षांपूर्वी आरोपी दत्तात्रेय गोळे याला मोबाईल नंबर दिला नाही. याचा राग मनात धरून पीडित महिलेच्या नकळत त्यांचा व्हिडीओ मोबाईलमध्ये घेतला. व्हिडीओला तृतीय पंथीयांच्या गाण्यावर डब करून तो मित्रांना पाठवला. यामुळे महिलेची बदनामी झाली, तसेच, फिर्यादी महिलेला पाहून टाळ्या वाजवून अश्लील हावभाव केले, म्हणून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.