महिला डॉक्टरचा गळा दाबण्याचा प्रयत्न; बाळ दगावल्याच्या कारणावरून नातेवाईक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 03:34 PM2017-10-07T15:34:43+5:302017-10-07T15:37:28+5:30

प्रसुती दरम्यान बाळ दगावल्याच्या कारणावरून एका महिला डॉक्टरवर हल्ला करीत तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न नातेवाईकांनी केला.

Women's doctor tries to thwart; Relatives relish due to child abuse | महिला डॉक्टरचा गळा दाबण्याचा प्रयत्न; बाळ दगावल्याच्या कारणावरून नातेवाईक संतप्त

महिला डॉक्टरचा गळा दाबण्याचा प्रयत्न; बाळ दगावल्याच्या कारणावरून नातेवाईक संतप्त

Next

पिंपरी : प्रसुती दरम्यान बाळ दगावल्याच्या कारणावरून एका महिला डॉक्टरवर हल्ला करीत तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न नातेवाईकांनी केला. ही घटना आज (शनिवार) पहाटे अडिचच्या सुमारास घडली. या घटनेच्या निषेधार्थ वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत.
निलम उपाप या महिलेला प्रसुतीसाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. सोनोग्राफीत बाळ जिवंत असल्याचे दिसून आले होते. मात्र, प्रसुतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी येथील महिला डॉक्टर प्रियांका यांच्या थोबाडीत मारली. तसेच केस ओढत गळाही दाबण्याचा प्रयत्न केला. तर प्रसुती दरम्यान बाळ दगावले तर आम्हाला उशीरा का सांगितले, असा सवालही नातेवाईकांनी केला.
बाळाच्या गळ्याला नाळ गुंडाळली गेली होती. या गोष्टी सोनोग्राफीत दिसत नाहीत. त्यामुळे प्रसुती दरम्यान बाळाचा मृत्यू झाला, असा खुलासा वायसीएम रुग्णालयाच्यावतीने करण्यात आला. 

Web Title: Women's doctor tries to thwart; Relatives relish due to child abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.