कमानीच्या कामामुळे रस्ता झाला अरुंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:33 AM2018-08-31T00:33:09+5:302018-08-31T00:33:41+5:30

वाहनचालक त्रस्त : तळवडे येथील सॉफ्टवेअर चौकातील समस्या

The work of the arches caused the road to be narrow | कमानीच्या कामामुळे रस्ता झाला अरुंद

कमानीच्या कामामुळे रस्ता झाला अरुंद

Next

तळवडे : येथील सॉफ्टवेअर चौकात कमानीचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या मधोमध व दोन्ही बाजूंच्या पादचारी मार्गावर खड्डे खोदण्यात आले आहेत. रस्त्यावर मुरमाचा ढीग लावण्यात आला असल्याने मार्ग अरुंद झाला आहे. पादचाऱ्यांनाचालण्यासाठी पदपथ नसल्यामुळे जीव धोक्यात घालून रस्त्यावर चालावे लागत आहे. नियोजनशून्य कारभाराचा फटका प्रवाशांना आणि वाहनचालकांना बसत असल्याच्या तक्रारी होत आहेत.

तळवडे येथील तंत्रज्ञान औद्योगिक उद्यान असून, या ठिकाणी पिंपरी-चिंचवड, तसेच पुणे शहरातून जवळपास २० हजार संगणक अभियंते येतात. सॉफ्टवेअर चौकात कमानीचे काम एमआयडीसीतर्फे करण्यात येत आहे. त्यासाठी चार दिवसांपासून खोदकाम केले आहे. त्यानंतर सदर कामात कोणतीही प्रगती नाही.
कमानीसाठी खोदण्यात आलेल्या या खड्ड्यांमुळे येथील वाहतूककोंडीत भर पडली आहे. आयटी अभियंत्यांना कामावर पोहचण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी आयटी कंपन्या करीत आहेत. हे काम सुरु करताना वाहतुकीला व प्रवाशांना अडथळा होणार नाही, याची दक्षता घेणे अपेक्षित असताना तसा कोणताही विचार केलेला नाही. त्यामुळे वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

राज्यभरात औद्योगिक वसाहतींना प्रवेशद्वार बनविण्याची कामे सुरू आहेत. त्याच कामांतर्गत तळवडेत प्रवेशद्वार बनविण्याचे काम सुरू केले आहे. खड्ड्यात त्वरित काँक्रिट करून मुरुम टाकून बुजविण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. पादचाºयांसाठी लवकरच पर्यायी सुविधा केली जाईल. काम करताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल.
- गणेश रेड्डी, सहायक अभियंता, एमआयडीसी

कमानीचे काम करणार असल्याबाबत कंपन्यांना कल्पना देणे अपेक्षित होते. त्यांच्याशी सल्लामसलत केली नाही. काम करत असताना होणाºया वाहतूककोंडीचा विचार केला नाही. सॉफ्टवेअर कर्मचारी व इतर प्रवाशांना यामुळे त्रास होत असल्याने सुटीच्या कालावधीत करण्यासाठी कामाची पुनर्आखणी करावी, वाहतूककोंडी टाळण्याची दक्षता एमआयडीसी व ठेकेदारांनी घ्यावी.
- जयंत कोंडे, प्रशासकीय व्यवस्थापक, सिंटेल, तळवडे

Web Title: The work of the arches caused the road to be narrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.