कामगारांची मुले मैदानाविना

By Admin | Published: April 22, 2017 03:55 AM2017-04-22T03:55:31+5:302017-04-22T03:55:31+5:30

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पिंपरीतील २८ एकर जागेवरील अण्णासाहेब मगर स्टेडियम हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे १९९२ ला हस्तांतरीत करण्यात आला.

Workers' children are not dining | कामगारांची मुले मैदानाविना

कामगारांची मुले मैदानाविना

googlenewsNext

पिंपरी : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पिंपरीतील २८ एकर जागेवरील अण्णासाहेब मगर स्टेडियम हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे १९९२ ला हस्तांतरीत करण्यात आला. या बदल्यात महापालिकेकडून पाच जागा मंडळाला देण्यात येणार होत्या. त्यापैकी चार जागा मिळण्याच्या प्रतीक्षेत कामगार मंडळ आहे. त्यामुळे विविध उपक्रम राबविण्यासाठी, तसेच मुलांना खेळण्यासाठी मैदानही उपलब्ध नसल्याने मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे.
शहराची ओळख औद्योगीकनगरी व कामगारनगरी अशी आहे. त्यामुळे हजारो कामगार शहरात वास्तव्यास आहेत. मात्र, कामगार मंडळांकडून राबविण्यात येणारे उपक्रम, स्पर्धा व कार्यक्रमासाठी मंडळाकडे जागाच उपलब्ध नाहीत. महापालिकेशी झालेल्या कराराप्रमाणे पाच जागा मिळणे अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या बदल्यास एकच जागा चिंचवडमधील सर्व्हे क्रमांक १९५ येथे देण्यात आली आहे. मात्र, त्याठिकाणीही अतिक्रमण सुरू झाले आहे. या जागेवर महापालिकेने २००८ ला मंडळाच्या परवानगीविना झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन प्रकल्पातील लाभार्थींसाठी शेड उभारले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुन्हा महापालिकेने जागेवर रस्ता रुंदीकरण केले. त्यामुळे कामगार मंडळाकडे हस्तांतरीत एका जागेचाही उपयोग झालेला नाही. (प्रतिनिधी)

कामगार भवनाला नाही अग्निशामक यंत्रणा
दरम्यान, महापालिकेकडून उर्वरित जागा मिळविण्याचे सोडून मंडळाने चिंचवड येथील संभाजीनगर येथे एमआयडीसीकडून जागा विकत घेऊन बहुउद्देशीय कामगार भवन उभारले. परंतु, हे बहुउद्देशीय कामगार भवन सुरूहोऊन चार वर्षे उलटूनही याठिकाणी अग्निशामक यंत्रणा उपलब्ध नाही. इमारतीमध्ये काम करणारे कर्मचारी, अधिकारी, रोज सुविधांसाठी येणारे कामगार व त्यांचे कुटुंबीय, बालवाडीत येणारी बालके या सर्वांची सुरक्षा वाऱ्यावर आहे.

महापालिकेने अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या जागेच्या बदल्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला चिंचवड येथील उद्योगनगर येथे जागा दिली आहे. उर्वरित जागांचे भूसंपादन व हस्तांतरण प्रक्रिया सुरू आहे.
- मीनिनाथ दंडवते, सहायक आयुक्त, भूमी-जिंदगी विभाग

Web Title: Workers' children are not dining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.