कामगारांच्या पदरी निराशा

By admin | Published: March 21, 2017 05:13 AM2017-03-21T05:13:39+5:302017-03-21T05:13:39+5:30

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. कामगार वर्ग मोठ्या अपेक्षेने या अर्थसंकल्पाकडे

Workers disappointment | कामगारांच्या पदरी निराशा

कामगारांच्या पदरी निराशा

Next

पिंपरी : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. कामगार वर्ग मोठ्या अपेक्षेने या अर्थसंकल्पाकडे पाहत होता. मात्र, कामगारांच्या पदरी निराशा पडली आहे. कामगारांकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले, अशा प्रतिक्रिया कामगार संघटनेच्या प्रतिनिधींकडून उमटल्या.
पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिकनगरी अशीही ओळख आहे. शहरात अनेक छोटे-मोठे उद्योग असून हजारो कामगार करतात. येथील कारखान्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. शहर व राज्याच्या विकासात उद्योग व कामगारांचा मोठा सहभाग आहे. दरम्यान, कामगारांनाही शासनाकडून सुविधा मिळणे गरजेचे आहे. शनिवारी सादर करण्यात
आलेल्या अर्थसंकल्पामधून
मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, कामगारांनी अर्थसंकल्पाबाबत निराशा व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Workers disappointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.