राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार - कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 07:28 PM2023-05-02T19:28:59+5:302023-05-02T19:29:34+5:30

नाक्यावरील कामगारांकरीता कामगार निवारा उभारणार...

Workers setu registration center will be set up in every taluk of the state - Labor Minister Dr. Suresh Khade | राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार - कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार - कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

googlenewsNext

पिंपरी : राज्याच्या अर्थव्यवस्थेत कामगार महत्वाचा घटक असून कामगारांच्या कल्याणाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील सर्व कामगारांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या कामगार नोंदणीसाठी कामगार सेतू नोंदणी केंद्र, नाक्यावरील कामगारांकरीता कामगार निवारा उभारणार आहे, असे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे  यांनी चिंचवड येथे जाहीर केले.

चिंचवड येथील प्रा रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राज्यस्तरीय कामगार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अश्विनी जगताप,  प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सतिश देशमुख,  विवेक कुंभार, अपर कामगार आयुक्त शैलेद्र पोळ,  अपर कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, संचालक एम. आर. पाटील,   डी. पी. अंतापुरकर, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थित होते.

नेते बाबा आढाव, अजित अभ्यंकर यांचा गौरव
ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, अजित अभ्यंकर, बाबा कांबळे, केशव घोळवे यांचा सन्मान केला. अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना २ लाख रुपये अर्थसहाय्य, बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसाला ५ लाख रुपये, नैसर्गिक मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसाला २ लाख रुपये,  बांधकाम कामगारांच्या नैसर्गिक मृत्यू झालेल्या त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस २४ हजार रुपये, अत्यंविधीकरीता १० हजार रुपये, कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटप,  शिवणयंत्र वाटप करण्यात आले.  घरेलू कामगाराना मदत गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली.

डॉ. खाडे म्हणाले, कामगारांना हक्काच्या सर्व सोईसुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभारण्यात येईल. कामगारांना आरोग्यविषयक सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी राज्यात ६ मल्टीस्पेशालटी रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यात असे रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कामगारांचा अपघात झाल्यावर त्यांचा कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्यासाठी विमा कंपनीबाबत योजना तयार करण्यात येत आहे. सुरक्षा मंडळातील कर्मचारी, अर्धवेळ काम करणाºया कामगाराला एक हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.’’

खासदार बारणे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड ही कष्टकºयाची, कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते. कामगारांना हक्काचे घर, मोफत उपचार, विमा, पाल्याना शिष्यवृत्ती, सुरक्षा आदी सुविधा शासनाच्या वतीने पुरविण्यात येत आहे.’’ देशमुख यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या पुस्तिकेचे अनावरण केले.  बाष्पके संचालनालयाच्या बाष्पके कामगारासाठी सुरक्षितेतच्यादृष्टीने तयार करण्यात आलेली चलचित्रफीत दाखविली.

Web Title: Workers setu registration center will be set up in every taluk of the state - Labor Minister Dr. Suresh Khade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.