एचआर कनेक्ट’तर्फे कार्यशाळा
By admin | Published: April 24, 2017 04:45 AM2017-04-24T04:45:15+5:302017-04-24T04:45:15+5:30
एचआर कनेक्ट असोसिएशनच्या वतीने भोसरी येथे शनिवारी एचआर क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांसाठी महाराष्ट्र माथाडी
‘पिंपरी : एचआर कनेक्ट असोसिएशनच्या वतीने भोसरी येथे शनिवारी एचआर क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांसाठी महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायद्याचे अधिनियम व तरतुदी या सत्राचे आयोजन करण्यात आले.
सत्राचे सादरीकरण महाराष्ट्र शासनाचे लेबर आॅफिसर आणि पिंपरी-चिंचवड माथाडी बोर्डाचे सचिव रोहन रुमाले यांनी केले. माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा व त्यामधील तरतुदी समजावून सांगितल्या. उपस्थित प्रेक्षकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एचआर कनेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी संतोष चव्हाण, अनिल भोईटे, वनराज भोसले, चेतन मुसळे, धीरज अधिकारी, शिवाजी चौंडकर, मधुकर सूर्यवंशी, संजय वाघमारे, रवींद्र शिंदे, संतोष बर्गे, आप्पासाहेब मोरे, अक्षय दिघे, अर्जुन माने, विजय पाटील, सतीश पवार, सोपान फरांदे, निशिकांत काटकर, आत्माराम बोचरे, सोनाली देसाई, सागर वाव्हळ, सिद्धार्थ जाधव, साई पाचंगे, आनंद जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सिद्धार्थ जाधव व सोनाली देसाई यांनी सूत्रसंचालन केले. तसेच एचआर कनेक्ट असोसिएशनच्या माध्यमातून पुढेही असे कार्यक्रम घेण्याचा मानस आहे, असे एचआर कनेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)