पिण्याच्या पाण्याची मिटली चिंता

By admin | Published: July 3, 2017 03:18 AM2017-07-03T03:18:04+5:302017-07-03T03:18:56+5:30

पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात धुवाधार पाऊस पडत आहे. संततधार पवना धरण परिसरात गेल्या २४ तासांत ९८ मिमी पावसाची

Worried about drinking water | पिण्याच्या पाण्याची मिटली चिंता

पिण्याच्या पाण्याची मिटली चिंता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात धुवाधार पाऊस पडत आहे. संततधार पवना धरण परिसरात गेल्या २४ तासांत ९८ मिमी पावसाची  नोंद झाली आहे. पवना  धरणातील पाणीसाठा वाढल्याने दहा टक्के पाणीकपात प्रशासनाने मागे घेतली आहे.
शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतरही समाधानकारक पाऊस पडलेला नव्हता. पाणीसाठा २० टक्क्यावर गेल्याने महापौर नितीन काळजे यांनी दिवसाआड पाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, टँकर लॉबीसाठी कपात केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी पक्षांनी पाणीकपातीला विरोध केला होता.
धरणात मुबलक पाणीसाठा असताना प्रशासनाने कपात लादली आहे, असा आरोप केला होता. त्यामुळे जनआंदोलन उसळू नये या भीतीने सत्ताधाऱ्यांनी समयसूचकता दाखवून जूनच्या पहिल्या आठवड्यात एक पाऊस झाल्यानंतर महापौरांनी दिवसाआड पाणीकपात मागे घेतली. नियमितपणे केवळ दहा टक्के पाणीकपात कायम ठेवली. त्यानंतर अनेक दिवस पाऊस पडला नाही. गेल्या आठवड्यात पावसास जोरदार सुरूवात झाली आहे.
आठवडाभर सलगपणे पाऊस सुरू आहे. शनिवारी सकाळी सहा ते रविवारी पहाटे सहा या वेळेत ९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात सात दिवसांत १२.८८ टक्के वाढ झाली. धरणात सध्या तीन टीएमसी उपयुक्त पाणी आहे. मावळात जोरदार पाऊस सुरू असल्याने धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे पुणे-मुंबईतील पर्यटकांची वर्षाविहारासाठी गर्दी वाढू लागली आहे. मावळातील पवना धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पवना परिसराची एक जूनपासून आठशे मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एका महिन्यात पाणीसाठा ही १५ टक्क्यांनी वाढला आहे. ही वाढ समाधानकारक असून, याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही शहर परिसरातील दहा टक्के पाणीकपात रद्द केली असून, रविवारपासून नियमितपणे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दहा टक्के पाणीकपात मागे घेतली आहे.

Web Title: Worried about drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.