पिंपरीत हातभट्टीवर धाड ; चार लाखांचे साहित्य जप्त व नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 09:35 PM2019-09-27T21:35:48+5:302019-09-27T21:36:55+5:30
पिंपरीतील भाटनगर येथे अवैध दारूभट्टीवर धाड टाकण्यात आली.
पिंपरी : हातभट्टी दारुची निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर धाड टाकण्यात आली. १५४१ लिटर दारु, ५४३० लीटर दारु निर्मितीचे रसायन व १५० लीटर ताडी व इतर साहित्य असे ४ लाख ६ हजार ९६० रुपये किमतीचे साहित्य जप्त व नष्ट करण्यात आले. गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पिंपरीतील भाटनगर येथे गुरुवारी (दि. २६) सायंकाळी ही कारवाई केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने पिंपरीतील भाटनगर येथे अवैध दारूभट्टीवर धाड टाकण्यात आली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात ११ आरोपींविरोधात एकूण १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्त्याल, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील व श्रीधर जाधव, सहा पोलीस निरीक्षक, ११ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक व ८२ पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.