कार्ल्यात कुस्त्यांचा रंगला आखाडा; परराज्यातील पैलवानाचींही हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:39 PM2018-01-04T12:39:40+5:302018-01-04T12:42:42+5:30

कार्ला गावचे ग्रामदैवत भैरवनाथमहाराज उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात मावळ तालुका, जिल्हा तसेच कर्नाटक सारख्या परराज्यातील पैलवानानींही हजेरी लावली. 

wrestling competition in Karla, Pimpari chinchwad | कार्ल्यात कुस्त्यांचा रंगला आखाडा; परराज्यातील पैलवानाचींही हजेरी

कार्ल्यात कुस्त्यांचा रंगला आखाडा; परराज्यातील पैलवानाचींही हजेरी

googlenewsNext
ठळक मुद्देपन्नास रुपयांपासून सात हजार रुपयांचे पैलवानांना इनामसावरी सातकने मुलाबरोबर कुस्ती खेळून दाखविले कुस्तीच्या खेळाचे कौशल्य

कार्ला : कार्ला गावचे ग्रामदैवत भैरवनाथमहाराज उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात मावळ तालुका, जिल्हा तसेच कर्नाटक सारख्या परराज्यातील पैलवानानींही हजेरी लावली. 
पैलवानांनी कुस्तीतील कौशल्य कुस्ती शौकिनांना दाखविले. सावरी सातकर या पुणे जिल्हा विजेत्या मुलीने कुस्तीच्या खेळाचे कौशल्य मुलाबरोबर कुस्ती खेळून दाखविले. उपस्थितांनी टाळ्यांचा गजरात सावरीला दाद दिली, पन्नास रुपयांपासून सात हजार रुपयांचे इनाम निकाली कुस्ती करणाऱ्या पैलवानांना देण्यात आले. सर्वच लढती शिस्तबद्ध झाल्या. पंच म्हणून सागर हुलावळे, सनी हुलावळे, नंदू हुलावळे, दीपक हुलावळे, भरत हुलावळे, संदीप मोरे, रोहिदास हुलावळे, कैलास हुलावळे, बाळू हुलावळे, विनोद हुलावळे यांनी काम पाहिले. लढतींचे समालोचन, सूत्रसंचालन भाऊसाहेब हुलावळे यांनी केले. या वेळी कार्ला पंचक्रोशीसह तालुका व जिल्ह्यातील कुस्ती शौकिनांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Web Title: wrestling competition in Karla, Pimpari chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.