कुस्ती स्पर्धा - टाळगाव चिखलीत रंगला आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 03:47 AM2018-04-03T03:47:57+5:302018-04-03T03:47:57+5:30

येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथमहाराज उत्सव व हनुमान जन्मोत्सवाचे टाळगाव चिखली उत्सव कमिटीतर्फे उत्सवाचे आयोजन करण्यात आले. हनुमान जन्मोत्सव, तसेच काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावोगावच्या पैलवानांनी यात सहभागी होत स्पर्धेत रंगत आणली.

Wrestling Contest - Tollgaon Chikhliit Rangala Akhaada | कुस्ती स्पर्धा - टाळगाव चिखलीत रंगला आखाडा

कुस्ती स्पर्धा - टाळगाव चिखलीत रंगला आखाडा

googlenewsNext

चिखली  - येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथमहाराज उत्सव व हनुमान जन्मोत्सवाचे टाळगाव चिखली उत्सव कमिटीतर्फे उत्सवाचे आयोजन करण्यात आले. हनुमान जन्मोत्सव, तसेच काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावोगावच्या पैलवानांनी यात सहभागी होत स्पर्धेत रंगत आणली. रोमहर्षक लढतींमुळे कुस्तीचा आखाडा रंगला.
उत्सवानिमित्त श्री भैरवनाथ महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. देवाला हारतुरे अर्पण करण्यात आले. घाटाचे पूजन करण्यात आले. गावातील शर्यतीच्या बैलांची नगारा, ताशा, डफ अशा पारंपरिक वाद्यांच्या तालात भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गावातील सजवलेले शर्यतीचे शेकडो बैल मिरवणुकीत सहभागी झाले आले. ते पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. उत्सवानिमित्त टाळमंदिर येथे चक्री भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी जोतिबाच्या काठीची मिरवणूक काढण्यात आली; तसेच करमणुकीसाठी रात्री लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम रंगला.
यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंचक्रोशीच्या तालमीतील नामांकित पैलवानांनी सलामी दिली. आखाड्यात राष्ट्रीय महिला कुस्तीपटू तेजल सोनवणे हिचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्रेक्षकांना डोळ्याचे पारणे फेडणाºया अटीतटीच्या लढती बघायला मिळाल्या. कुस्त्या बघण्यासाठी शौकिनांनी गर्दी केली होती. पंच म्हणून वस्ताद सदाशिव नेवाळे यांनी काम पाहिले.
आमदार महेश लांडगे, नगरसेवक राहुल जाधव, दत्ता साने, कुंदन गायकवाड, संजय नेवाळे, साधना मळेकर, संगीता ताम्हाणे, स्वीनल म्हेत्रे, अंकुश मळेकर, प्रभाकर ताम्हाणे आदी या वेळी उपस्थित होते. टाळगाव चिखली उत्सव कमिटीतर्फे उत्सवाचे व आखाड्याचे आयोजन करण्यात आले. रात्री पारंपरिक पद्धतीने प्रकाश मोरे यांनी चावडीवर बिदागीचे वाटप केले.

Web Title: Wrestling Contest - Tollgaon Chikhliit Rangala Akhaada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.