‘वायसीएम’मधील लुटीची चौकशी सुरू, आरोग्य वैद्यकीय अधिका-यांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:59 AM2017-09-20T00:59:41+5:302017-09-20T00:59:43+5:30

गरिबांना जीवन देणारे रुग्णालय म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय असून, या रुग्णालयातील रुग्णसेवेकडे महापालिकेचे सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे लक्ष नसल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून उघडकीस आणले.

'YCM' launches inquiry, health officials interfere | ‘वायसीएम’मधील लुटीची चौकशी सुरू, आरोग्य वैद्यकीय अधिका-यांकडून दखल

‘वायसीएम’मधील लुटीची चौकशी सुरू, आरोग्य वैद्यकीय अधिका-यांकडून दखल

Next

पिंपरी : गरिबांना जीवन देणारे रुग्णालय म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय असून, या रुग्णालयातील रुग्णसेवेकडे महापालिकेचे सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे लक्ष नसल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून उघडकीस आणले. रुग्णांना बाहेरून औषध आणायला लावणे, गोळ्या देण्याच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाइकांची ‘आर्थिक’ लूट केली जात आहे. याची चौकशी प्रशासनाने सुरू केली आहे. रुग्णांची लूट करणा-यांवर कडक कारवाई करणार असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.
संत तुकारामनगर येथे वायसीएम रुग्णालय आहे. तेथील रुग्णसेवेकडे महापालिका प्रशासन आणि पदाधिका-यांचे लक्ष नसल्याने सर्वसामान्यांची लूट होत आहे, याबाबतचे स्टिंग आॅपरेशन लोकमतने केले. शिकाऊ डॉक्टरांचा भरणा, प्रशासकीय यंत्रणा नियोजन आणि अंमलबजावणीचा अभाव, जबाबदार व्यक्ती तातडीक विभागात नसणे, रुग्णांना बाहेरून औषध आणायला लावणे, गोळ्या देण्याच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाइकांची ‘आर्थिक’ लूट केली जात असल्याचे पुराव्यासह उघड केले. वायसीएममध्येही रुग्णांची लूट या शीर्षकाखाली सोमवारच्या अंकात वृत्त
प्रकाशित केले होते. तातडीक विभागातील अधिकाºयांची केबिन मोकळीच होती. साफसफाईसाठी असणारे कर्मचारी वॉर्डबॉयची कामे करताना दिसले होते.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत प्रशासनाची तातडीची बैठक घेतली. रुग्णसेवेला कोणी बाधा आणत असेल, तर कारवाई करणार असल्याचेही सांगितले.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर उपचार करताना डॉक्टरांकडून अडवणूक केली जाते. औषधे उपलब्ध नाहीत, असे कारण दाखविले जाते. औषधे आणि इंजेक्शनसाठी रुग्णाच्या नातेवाइकांना बाहेर पाठविले जाते. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांच्या पाकिटावर नॉट फॉर सेल असे लिहिलेले असते. नॉट फॉर सेल असणाºया गोळ्या माथी मारण्याचे काम केले जात आहे. फ्री सॅम्पल गोळीसाठी डॉक्टरांनी शंभर रुपयांची मागणी केली. रुग्णालयात अशा प्रकारची लूट होत असल्याचे उघडकीस आणले होते.
संबंधित प्रकाराची दखल वैद्यकीय विभागाने घेतली आहे. हॉस्पिटलची बदनामी करण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल, तर कडक कारवाई केली जाणार आहे. चौकशी सुरू केली आहे.
- डॉ. अनिल रॉय, मुख्य वैद्यकीय अधिकारी

Web Title: 'YCM' launches inquiry, health officials interfere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.