‘वायसीएम’ डॉक्टरांविना सलाइनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:59 AM2017-08-19T01:59:47+5:302017-08-19T01:59:50+5:30

पिंपरी-चिंचवडसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला (वायसीएम) अपु-या मनुष्यबळाची समस्या भेडसावत आहे.

'YCM' without the doctor on the line | ‘वायसीएम’ डॉक्टरांविना सलाइनवर

‘वायसीएम’ डॉक्टरांविना सलाइनवर

googlenewsNext

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला (वायसीएम) अपु-या मनुष्यबळाची समस्या भेडसावत आहे.
तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी यांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. डॉक्टरांची संख्या पुरेशी नसल्याने उपचार क रण्यासाठी विलंब होत असल्याची तक्रार रुग्ण आणि डॉक्टरांकडूनही होऊ लागली आहे. शिवाय डॉक्टरांवर कामाचा ताणही पडत आहे.
शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने महापालिकेने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या धर्तीवर संत तुकारामनगर येथे सुमारे अठ्ठावीस वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाची स्थापना केली. या रुग्णालयात शहरातीलच नव्हे तर आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेडसह सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद अशा विविध भागांतील रुग्ण उपचारासाठी येत असतात. विविध अपघातांमध्ये गंभीर जखमींना वायसीएमधील डॉक्टरांनी जीवदान दिले आहे. हा लौैकिक ऐकून उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, महापालिकेकडून येथील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ यांची संख्या वाढवली जात नाही.
महापालिकेचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून ओळख असलेल्या रुग्णालयातील बहुतांश डॉक्टर मानधनावर तर परिचारिका, वॉर्ड बॉय, टेक्निशियन यांसह अन्य कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. अपघातातील गंभीर रुग्णांना तातडीक विभागात आणले असता पुरेशे डॉक्टर नाहीत. यामुळे रुग्णांची हेळसांड होते.
>शल्यचिकित्सकांची संख्या अपुरी असल्याने अनेक रुग्णांच्या
शस्त्रक्रिया रखडलेल्या असतात. भुलतज्ज्ञांच्याही जागा रिक्त आहेत. आंतररुग्ण विभागात हजारो रुग्ण भरती केले जातात. या रुग्णांच्या शुश्रूषेसाठी आवश्यक असणाºया परिचारिक ा, वॉर्ड बॉय यांचीही संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे.
७५० खाटांच्या या रुग्णालयात अतिदक्षता विभागात ५० रुग्णांवर उपचार केले जातात. या रुग्णालयासाठी ७३ वैैद्यकीय अधिकाºयांची आवश्यकता आहे. मात्र यापैैकी केवळ ३७ जागांवरच नियुक्त्या केल्या आहेत. रुग्णालयासाठी सुमारे ९५० लोकांचा स्टाफ असून त्यामध्ये ५९० कायम कर्मचारी, तर ४०९ कंत्राटी तसेच मानधनावर काम करत आहेत.
सुरक्षा अन् सुविधांचा अभाव
रुग्णालयातील डॉक्टरांची अपुरी संख्या येथील उपलब्ध डॉक्टरांसाठी अधिक डोकेदुखी ठरत आहे. एखादा गंभीर इजा झालेला रुग्ण उपचारासाठी आणला असता डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्या रुग्णाच्या तपासणीसाठी बिलंब लागतो. अशा वेळी रुग्णाच्या नातेवाइकांकडून गोंधळ घातला जातो. तोडफोड केली जाते. प्रसंगी डॉक्टरांना मारहाणही केली जाते. याच कारणांमुळे काही महिन्यांपूर्वी ‘मार्ड’ने संप केला होता. सुरक्षा अन् सुविधांची येथे वानवा आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
महाविद्यालयाचा घाट
डॉक्टर अन् रुग्णांकडून वारंवार तक्रारी होत असतानाही डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यास अद्याप महापालिकेला मुहूर्त सापडत नाही. मात्र, पालिका प्रशासनाने ‘वायसीएम’मध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा घाट घातला आहे. रुग्णांना योग्य सेवा देण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करणे गरजेचे असताना महाविद्यालयाचा हट्ट कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय महाविद्यालयासाठी डॉक्टरांच्या जागा भरण्यास पालिकेला परवडते. मग, यापूर्वी अपुºया डॉक्टरसंख्येमुळे रुग्णांची हेळसांड होताना प्रशासनाने डॉक्टरांची भरती का केली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
>बालरोग
तज्ज्ञांची वानवा
बाह्यरुग्ण विभागात दररोज हजारोंच्या संख्येने उपचारासाठी रुग्ण येत असतात. यातील बहुतांश रुग्ण मेडिसीन विभागाशी संबंधित असतात. सुमारे पाचशे रुग्ण तपासण्यासाठी मेडिसीन विभागात येतात. मात्र या विभागातील डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे डॉक्टरांवर ताण येत असून त्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे. बालरोगतज्ज्ञ, फिजिशियन यांची संख्याही अपुरी आहे.

Web Title: 'YCM' without the doctor on the line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.