यंदाही हगणदरीमुक्त जिल्हा अशक्य

By admin | Published: May 18, 2015 05:36 AM2015-05-18T05:36:29+5:302015-05-18T05:36:29+5:30

निर्मलग्राम मोहिमेंतर्गत जिल्हा परिषद ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील उर्वरित गावे हगणदरीमुक्त करणार होती. मात्र, मार्चअखेर १ लाख १३ हजार ५0७ कुटुंबांकडे

This year, the District of Hadhadari is impossible | यंदाही हगणदरीमुक्त जिल्हा अशक्य

यंदाही हगणदरीमुक्त जिल्हा अशक्य

Next

पुणे : निर्मलग्राम मोहिमेंतर्गत जिल्हा परिषद ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील उर्वरित गावे हगणदरीमुक्त करणार होती. मात्र, मार्चअखेर १ लाख १३ हजार ५0७ कुटुंबांकडे अद्याप शौचालये नाहीत. तसेच ९१४ ग्रामपंचायती अद्याप निर्मल होणे बाकी आहे. या वर्षात यापैकी ५५ हजार २८७ शौचालयांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे या वर्षातही हगणदारीमुक्त जिल्हा अशक्य आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामस्थ आदींनी मार्च २०१५ अखेर तालुके निर्मलग्राम करण्याची शपथ घेतली होती. १,३६,७२८ कुटुंबे निर्मल करण्याचा ध्यास घेतला होता. मात्र यापैकी मार्च २0१५ अखेर २४ हजार ६१0 कुटुंबे निर्मल करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
जिल्हा १00 टक्के हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक पालक अधिकारीही नेमले होते. यात मुळशी तालुका १00 टक्के हगणदारीमुक्त झाला आहे. मार्चअखेर २ हजार ९५३ कुटुंबांकडे शौचालये नसल्याचे दिसत असले तरी या कुटुंबांनी शौचालये बांधण्यास सुरुवात केली असून, ती कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यापाठोपाठ भोर तालुक्याने आघाडी घेतली आहे. वर्षभरात १ हजार ९३२ कुटुंबांनी शौचालये बांधली असून, अद्याप २ हजार ३५४ कुटुंबांकडे शौचालये नाहीत. विभक्त कुटुंबांमुळे हा आकडा जास्त दिसत आहे.

Web Title: This year, the District of Hadhadari is impossible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.