योगासनांमध्ये रमले शहरवासीय

By admin | Published: June 22, 2017 07:22 AM2017-06-22T07:22:04+5:302017-06-22T07:22:04+5:30

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्योगनगरीतील शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्थांच्या वतीने योगासनांचे प्रात्यक्षिक, व्याख्यान यांसारख्या कार्यक्रमांचे

In the Yogasam, the villagers of Ramle | योगासनांमध्ये रमले शहरवासीय

योगासनांमध्ये रमले शहरवासीय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्योगनगरीतील शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्थांच्या वतीने योगासनांचे प्रात्यक्षिक, व्याख्यान यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योगासन किती आवश्यक असते, याचे महत्त्व विविध तज्ज्ञांनी स्पष्ट केले. शहरातील शैक्षणिक संकुलांमध्ये जागतिक योग दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच विविध योगप्रसारक संस्थांनीदेखील योगप्रसाराच्या हेतूने विविध भागांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

चॅलेंजर पब्लिक स्कूल
पिंपळे सौदागर : येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात परिसरातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला योगाचार्य गिरीश जोशी यांनी उपस्थित नागरिकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना जीवनात योगाचे महत्त्व समजावून सांगितले व योग प्रशिक्षण दिले. या वेळी संस्थेचे चेअरमन संदीप काटे उपस्थित होते.
एस. जे. एच. गुरुनानक हायस्कूल
नवी सांगवी : ब्लॉसम प्रायमरी व एस. जे. एच. गुरुनानक हायस्कूलमध्येही विद्यार्थ्यांनी योगासने केली. मुख्याध्यापिका वृषाली पालांडे व तबस्सुम बादशाह यांनी ‘योग व दैनंदिन जीवन’ याची माहिती दिली. शाळेतील ९०० विद्यार्थ्यांनी तीन बॅचमध्ये योगासने करून कार्यक्रमात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे नियोजन राजश्री होनगर व सागर झगडे यांनी केले.
श्री शिवाजी विद्यामंदिर
औंध : येथील श्री शिवाजी विद्यामंदिरात योग दिनानिमित्त योगासनांची प्रात्यक्षिके घेण्यात आली. यानंतर योगविषयक धनंजय जगताप, सायली गडचे यांचे व्याख्यान झाले. या वेळी प्राचार्य सुदाम हिरवे, सहसचिव पंडित मोरे, कार्याध्यक्ष यादव कांबळे, उपप्राचार्य धानप्पा महालिंग, पर्यवेक्षिका कुसुम शर्मा, योगशिक्षक सतीश गडचे, क्रीडा विभागप्रमुख बलभीम भोसले, सुधाकर कांबळे, बिपीन बनकर, महेश आगम आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड माध्यमिक विद्यालय
निगडी : पेठ क्र. २५ येथील पिंपरी-चिंचवड माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीययोगदिन साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी आठला विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. योग प्रशिक्षक दशरथ जगताप यांनी योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. मुख्याध्यापक दिनेश ढोबळे यांनी योग दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. सतीश मेहेर यांनी प्रास्ताविक केले. सागर बंडलकर यांनी आभार मानले.
श्री भैरवनाथ विद्यालय
पिंपरी : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग अभ्यासक डॉ. नारायण वाघोले यांनी सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायम व हास्यासनाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करवून घेतली. तसेच योगामुळे शारीरिक व मानसिक कार्यक्षमता वाढते, असे मार्गदर्शन करताना सांगितले. तसेच ताणतणाव घालविण्यासाठी योग उपयुक्त असल्याचेही त्यांनी सांगितले.

नवमहाराष्ट्र विद्यामंदिर
रुपीनगर : जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी शवासन, भुजंगासन, वज्रासन, शीर्षासन, कपालभाती, भ्रमरी, ताडासन आदी आसनप्रकारांची प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिकांनी योगाचे महत्त्व विशद केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष आनंद गौैंड उपस्थित होते.
बालगोपाल विद्यानिकेतन
पिंपरी : वासुदेवाच्या आगमनाने योग दिनाची सुरुवात करण्यात आली. वासुदेवाने सकाळी लवकर उठण्याचे फायदे समजावून सांगितले. योग अभ्यासक बिथिक रामरथ यांनी योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखविली. कार्यक्रमाचे संयोजन संस्थापक अध्यक्ष कैलास कुदळे यांनी केले व मुख्याध्यापिका सीमा भोसले यांनी आभार मानले.
यशस्वी प्राथमिक विद्यालय
पिंपरी : संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवकाते यांनी शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी योगासने महत्त्वाची आहेत. योगामुळे मन आणि शरीर प्रसन्न राहते, या शब्दांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांनी योगाच्या विविध प्रकारांची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके करून दाखवली. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ
भोसरी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी क्रीडा शिक्षक गणेश चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना योगासनांचे महत्त्व स्पष्ट केले. ओंकाराने प्रात्यक्षिकांची सुरुवात झाली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष विलास लांडे, सचिव प्रताप खिरीड, प्राचार्य जी. एल. भोंग, अशोक पाटील, किरण चौैधरी, डी. बी. पवार आदी उपस्थित होते.
डॉ. डी. वाय पाटील महाविद्यालय
पिंपरी : भारतीय संस्कृतीत योगाला महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग आवश्यक आहे, असे मत डॉ. डी. वाय पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी मांडले. डॉ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य, महाविद्यालय आकुर्डी येथे योगाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी आर्ट आॅफ लिव्हिंगचे शिक्षक बबन राऊत यांनी योगाच्या सरावामुळे शरीर आणि मन कणखर होते. अमृता श्ािंदे यांनी सूत्रसंचालन केले. मुकेश तिवारी यांनी आभार मानले. किशोर पाटील, डी. बी. सावंत उपस्थित होते.
वंडर वेव्हज् ब्युटी ट्रेनिंग सेंटर
चिंचवड : येथे सेंटरच्या वतीने योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. मुख्य संचालिका छाया भालेराव यांनी विद्यार्थिनींना योगासनाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमास महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी कृष्णा तालेरा, अर्चना राजीवाडे, मोनिका सातकर, दीप्ती जयसिंगपुरे, स्मिता भोसले आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: In the Yogasam, the villagers of Ramle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.